आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी प्रथिने महत्त्वपूर्ण

भाज्या आहेत प्रथिनांचा उत्तम स्त्रोत, आहारात अवश्य करा त्यांचा समावेश

महाराष्ट्र : आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी प्रथिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यासोबतच आपल्या स्नायूंचे संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी प्रथिने आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आपल्या दैनंदिन आहारात प्रथिनांचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यामुळे आपले आरोग्य चांगले राहील अनेक रोग आपल्यापासून दूर राहतील.

मांसाहारी आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात असे म्हटले जाते. असे असले तरी जर तुम्ही शुद्ध शाकाहारी असाल तर तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही. अशा अनेक भाज्या आहेत ज्याचे सेवन करून तुम्ही सुद्धा प्रथिनांचे प्रमाण वाढवू शकता. या भाज्यांमध्ये फक्त प्रथिनेच नाही तर इतर पोषक तत्वे ही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे याचा दुप्पट फायदा होतो आणि हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

पालक पालकांमध्ये प्रथिन्यांसह लोह ही उत्तम प्रमाणात असते. पालक खाण्यासाठी तुम्ही पालकाची भाजी घरी बनवू शकता. यासोबतच पालकाचा वापर तुम्ही स्मुदी किंवा सॅलेड बनवण्यासाठी करू शकता. पालकाच्या भाजीमध्ये कॅलरीज कमी असतात पण त्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे, जीवनसत्वे आणि फायबर असते. ज्यामुळे पालक सुपर फूड म्हणून ओळखले जाते.

ब्रोकोली प्रथिनांचा उत्तम स्त्रोत म्हणूनही ब्रोकोली ओळखली जाते. ब्रोकोली मध्ये व्हिटॅमिन सी देखील मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यासोबतच ब्रोकोली मध्ये फायबरही भरपूर प्रमाणात असते.

ब्रुसेल स्प्राऊट्स यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि अँटॉक्सिडंट असतात ज्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. याशिवाय ब्रुसेल स्प्राऊट्स मध्ये व्हिटॅमिन के देखील मोठ्या प्रमाणात असते. जे हाडे मजबूत करण्यासोबतच आवश्यक पोषकत्वांपैकी एक आहे. त्यात व्हिटॅमिन सी देखील मोठ्या प्रमाणात आढळते.

वटाणे प्रोटीनचे प्रमाण वाढवण्यासाठी वटाणे फायदेशीर ठरतात वटाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात ज्यामुळे ह्रदयाचे आरोग्य सुधारते आणि पचन सुधारण्यास देखील मदत होते. वटाण्यामध्ये आवश्यक अमिनो ऍसिड देखील असतात जे स्नायूंच्या वाढीस प्रोत्साहन देतात.

डाळ भारतीय घरात मध्ये डाळ ही एक सामान्य गोष्ट आहे. डाळीचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. रक्तदान नियंत्रित करण्यासाठी आणि पचनास मदत करण्यासाठी डाळ फायदेशीर ठरते. डाळीमध्ये लोह, फोलेट, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जस्त चांगल्या प्रमाणात आढळतात. डाळ प्रथिने आणि फायबरचा एक उत्तम स्त्रोत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button