८४६ नवे रुग्ण, सात जणांचा मृत्यू
![846 new patients, seven deaths](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/corona-virus.jpg)
मुंबई | करोनामुळे मुंबईत शुक्रवारी सात जणांचा मृत्यू झाला. तर ८४६ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले. आतापर्यंत करोनामुळे एकूण मृतांची संख्या १६ हजार ६५४ झाली आहे.शुक्रवारी सापडलेल्या बाधितांमध्ये लक्षणे नसलेल्यांची संख्या ७३५ होती. तर रुग्णालयात दाखल केलेल्या एकूण रुग्णांची संख्या १११ असल्याची माहिती मुंबई पालिकेकडून देण्यात आली. दिवसभरात करोनातून १ हजार २९७ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के झाला आहे. रुग्णालयात सध्या एकूण १ हजार ६९१ रुग्ण दाखल आहेत. प्रतिबंधित झोपडपट्टया आणि चाळींची संख्या शून्य झाली असून तीन इमारती प्रतिबंधितआहेत. करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा २४ तासांत शोध घेण्यात आला असून त्यांची संख्या ५ हजार ५८७ आहे.
ठाणे : ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी ४०८ करोना रुग्ण आढळून आले आहेत, तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी आढळून आलेल्या ४०८ करोना रुग्णांपैकी ठाणे १३४, नवी मुंबई १२५, कल्याण-डोंबिवली ५९, ठाणे ग्रामीण २३, मिरा भाईंदर २२, उल्हासनगर २२, बदलापूर १२, अंबरनाथ आठ आणि भिवंडीमध्ये तीन रुग्ण आढळून आले. तर मृतांमध्ये अंबरनाथ दोन आणि ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
राज्य : १३,८४० नवे रुग्ण
मुंबई : राज्यात दिवसभरात १३,८४० नवे करोना रुग्ण आढळून आले असून ८१ जणांचा मृत्यू झाला. नव्या रुग्णांपेक्षा करोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिक असून राज्यात दिवसभरात २७,८९१ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाख ४४ हजार होती. राज्यात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण दिवसभरात आढळून आला नसून आतापर्यंत ३३३४ रुग्णांची नोंद झाली, त्यापैकी २०१३ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक आली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.