पिंपळे सौदागरमध्ये ‘वॉक फॉर गुड हेल्थ’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/IMG_20180407_131304.jpg)
पिंपरी- शरीर निरोगी राहण्यासाठी चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे. चालण्यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज कमी होतात. आपले हृदय निरोगी बनू शकते. त्या अनुषंगाने आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त नाना काटे सोशल फाउंडेशन व समरीटन्स च्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथे तीन किलोमीटर व पाच किलोमीटर साठी “वॉक फॉर गुड हेल्थ “चे आयोजन करण्यात आले होते.
या “वॉक फॉर गुड हेल्थ “ची सुरुवात रोझ आयकॉन शेजारील महापालिकेच्या मैदानातून झाली.पुढे शिवार चौक-कोकणे चौक-रहाटणी चौक पर्यंत करण्यात आली. “वॉक फॉर गुड हेल्थ” मध्ये सहभागी होणा-याकडून देणगी गोळा करून भोसरी येथील “स्नेहवन” या संस्थेला देण्यात आली. “स्नेहवन” या विश्वस्त संस्थेत दुष्काळग्रस्त शेतक-यांचे लहान मुले,आत्महत्या ग्रस्त शेतक-यांचे शिक्षणापासून वंचित असलेली मुले यांच्या वास्तव्याचा व शिक्षणाचा संपूर्ण खर्च केला जातो.
आय.टी.मधील नोकरी सोडून अशोक देशमाने यांनी “स्नेहवन” या संस्थेची स्थापना करून अशा मुलांचे संगोपन करत आहेत. या प्रसंगी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, रोझलँड रेसिडेन्सीचे चेअरमन संतोष मसकर, आनंद दप्तरदार, शिवार गार्डनचे प्रोप्रयटर नंदकुमार काटे, संदेश काटे पाटील, काळूराम कवितके, गोविंद वलेकर, किरण क्षीरसागर, ट्रस्टचे मोहन मुद्दाना, श्रीनिवास हाके, देबशीश चँटर्जी, संदीप रोड तसेच सोसायटीमधील नागरिक व लहान मुलांनी सहभाग घेतला.