breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

चीनमध्ये जीवघेण्या कोरोना विषाणूचे १,११० बळी…

चीनमध्ये जीवघेण्या कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. चीन सरकार बरेच प्रयत्न करून सुद्धा कोरोनाचं थैमान थांबण्याचं नाव घेत नाहीये.. बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत १,११० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ४२,७०८ नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. 

आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपर्यंत कोरोनाची लागण झालेल्या १,०१७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर चीनमध्ये आतापर्यंत ४२, ७०८ नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. तसंच, जगभरामध्ये ३९० नागरिकांना या विषाणूची लागण झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत.

चीनमध्ये कोरोना विषाणू हळूहळू रौद्ररुप धारण करत आहे. या विषाणूमुळे चीनमध्ये मृतांचा आकडा वाढत चालला आहे. दरम्यान, कोरोनासंदर्भात जिनेवामध्ये ४०० वैज्ञानिकांची बैठक गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहे. यामध्ये झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना विषाणूला केस रोखता येईल यावर चर्चा सुरु आहे. तर, कोरोनाच्या प्रसाराबाबत दुर्लक्ष केल्याबद्दल चीन सरकारने वुहानमधील अनेक अधिकाऱ्यांना पदावरून काढून टाकले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button