एन-95 मास्क पेक्षा सूती मास्क वापरणं अधिक फायदेशीर आणि सुरक्षित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Capture-88.jpg)
कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी मास्क घालणं आता बंधनकारक केलचं आहे. अनेकजण एन-95 मास्कला प्राधान्य देतात. मात्र वॉल्व असलेला एन-95 मास्क सुरक्षित नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आधीच सांगितले आहे. वॉल्व असलेले एन-95 मास्क संसर्ग रोखण्यास सक्षम नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. डॉक्टरांनी देखील हा मास्क वापरू नये असं सांगितले आहे. बाहेरून घेत असाल तरी, किंवा घरी बनवणार असाल तरी सूती मास्क वापरणं फायदेशीर आणि सुरक्षित असल्याचं म्हटलं जात आहे.
अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, एन-95 मास्क संसर्ग रोखण्यास सक्षम नाही. जर एखाद्या व्यक्तीने असा मास्क घातला असल्यास त्याच्या श्वासातील व्हायरस फिल्टर म्हणजेच रेस्पिरेटरद्वारे बाहेर येऊ शकतात. त्यामुळे वॉल्व असलेले एन-95 मास्क वापरणे चुकीचे आहे. तसेच सुती मास्कमुळे स्किन इनफेक्शनही होत नाही. बाकीच्या मास्कमुळे घाम येऊन नाकाभोवती आणि तोंडावर रेड रॅशेश, किंवा छोटे छोटे पुरळही येतात. पण सुती कापडाच्या मास्कमुळे अशी अॅलर्जी होण्याची शक्यता फार कमी असते.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/mask-4.jpg)
संसर्गापासून वाचण्यासाठी घरी बनवलेले मास्क अधिक फायदेशीर आहेत. चेहरा झाकण्यासाठी सुती कापडाचा वापरता करता येतो. याद्वारे मास्क बनविण्याआधी कापड 5 मिनिटे गरम पाण्यात धुवावे. मास्क घेताना तुमच्या आकाराचा आहे याची काळजी घ्यावी. अनेकदा लोक असे मास्क वापरतात, ज्यातून हवा आत-बाहेर येत जात असते. त्याचा काहीही फायदा होत नाही. बाजारात ट्रिपल लेअर मास्क, सिक्ल लेअर मास्क आणि एन-95 मास्क उपलब्ध आहेत. या मास्कची किंमत 100 ते 500 रुपयांपर्यंत आहे.
ऑनलाईन देखील मास्कची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. कॉटन, खादी आणि लिनन फॅब्रिकमध्ये हे मास्क उपलब्ध आहेत. दरम्यान, मास्क न लावता अजिबात घराबाहेर पडू नका. मास्क वापरल्यानंतर धुवा. वृद्धांनी शक्य असल्यास घरात देखील मास्क वापरावा.