breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

आरोग्य मंत्रालयाने सांगितले कोरोना रिकव्हरीनंतरचे प्रोटोकॉल – रोज योगासन, प्राणायम, मेडिटेशन आणि दिवसातून एकदा वॉक करा

आरोग्य मंत्रालयाने कोरोनाने बरे झालेल्या रुग्णांसाठी गाइडलाइन जारी केल्या आहेत. यामध्ये सांगण्यात आले आहे की, रोज योगासन, प्राणायाम आणि मेडिटेशन करा. सकाळी किंवा संध्याकाळी अवश्य वॉक करा, तसेच तुम्हाला गरज लागेल त्याच स्पीडने चला.

देशात 24 तासांमध्ये कोरोनाचे 82 हजार 498 रुग्ण आढळले आहे. यासोबतच आतापर्यंत 48लाख 34 हजार 386 लोक संक्रमित झाले आहेत. देशात आतापर्यंत 37 लाख 64 हजार 779 लोक बरे झाले आहेत. एका दिवसात रविवारी 1,045 मृत्यू झाले आहेत. मृतांची एकूण संख्या आता 79 हजार 669 झाली आहे.

महाराष्ट्रात आज दिवसभरात कोरोनाचे 22 हजार 543 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एूण संख्या 10 लाख 60 हजार 308 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 416 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 29 हजार 531 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 24 तासात 11 हजार 549 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. आतापर्यंत 7 लाख 40 हजार 061 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात सद्यस्थितीत 2 लाख 90 हजार 344 जणांवर उपचार सुरु आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button