breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

  • सरदार घराण्यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

पुणे । प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात शिवजयंती अत्यंत दिमाखात साजरी होत आहे. पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पुवृष्टी करण्यात आली. सरदार घराण्यातील वारसदारांच्या उपस्थितीत हा अत्यंत नयनरम्य सोहळा उत्साहात साजरा झाला.

गेली ११ वर्षे पुण्यमधील लालमहाल परिसरात स्वराज्य घराण्यांच्या वतीने शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा आयोजित केला जातो. मात्र, मागील २ वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रथ मिरवणुकीवर निर्बंध आल्याने आज रथ मिरवणूक न काढताच साजरा करण्यात आला.लालमहाल मध्ये माँ जिजाऊ व छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून व शिवज्योत प्रज्वलित करून सरदार घराण्यांच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक, वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह सरसेनापती, सरदार, सुभेदार, वीर मावळे व वीर मातांच्या घराण्यातील १० प्रतिनिधिंनी पारंपरिक पोशाखात, फेटा परिधान केलेल्या माता-भगिनींच्या हस्ते शिवज्योत एसएसपीएमएस संस्थेच्या  प्रागणांतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आणण्यात आली. त्यानंतर शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. आजच्या या कार्यक्रमात तब्बल १०० स्वराज्य घराण्यांनी सहभाग नोंदवला.

ढमाले घराण्याच्या वतीने अनंत ढमाले, रवींद्र ढमाले, नंदादीप प्रतिष्ठानच्या नीता ढमाले, राहुल ढमाले, मंगेश ढमाले यांच्या सह इतिहास संशोधक आशुतोष पाटील उपस्थित होते.या सोहळ्याचे आयोजन शिवजयंती आद्य प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, प्रवीण भैय्या गायकवाड, समीर जाधवराव, निलेश जेधे व सर्व सरदार घराण्यातील प्रतिनिधींनी केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button