breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१२ तासांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरूच, हवामान खात्याकडून येलो अलर्ट

सांगली : सांगली जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊसाची धुंवाधार बॅटिंग सुरू आहे. गेल्या बारा तासाहून अधिक काळापासून सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊसाची संततधार सुरू आहे. सांगली जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. दुष्काळी जत तालुक्यातही दमदार पाऊस पडत असून त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन संपूर्णता विस्कळीत झाले आहे.

सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. गुरुवारी सायंकाळपासून जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यानंतर जिल्ह्यातील अनेक भागात पाऊसाची रिपरिप आणि संततधार कायम आहे. सांगली शहर मिरजेसह परिसर आणि जिल्ह्यात तब्बल बारा तासापेक्षा अधिक काळापासून पाऊसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा मोठा परिणाम शहरी भागात पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साचलेले पाहायला मिळत आहे.

दुष्काळी जत तालुक्यातही धुंवाधार असा पाऊस पडत असून अनेक ठिकाणी नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तर वळसंग ते पाचापुर पुलावरून पाणी गेल्याने रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे जत पूर्व भागाचा जवळचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर सध्या शहरात ढगाळ वातावरण असून हिंगोली आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्येही ढग दाटून आल्याची माहिती आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल जपून ठेवावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button