breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय

#BREAKING: धक्कादायक! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची आत्महत्या; नैराश्यामुळे घेतलं टोकाचं पाऊल

मुंबई: मनोरंजन विश्वासाठी 2020 या वर्षात सर्वाधिक धक्कादायक घटना घडलेल्या आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दरम्यान धर्मशाळामधून आणखी एक धक्कादायक घटना समोर येते आहे बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा यांनी गळफास घेत आत्महत्या केलेली आहे. कांगडा जिल्ह्यातील धर्मशाळामध्ये मॅक्डोलगंज हे थंड हवेचे ठिकाण आहे. याठिकाणच्या जोगिबाडा रोडवर असणाऱ्या एका कॅफेजवळ गुरुवारी त्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यांच्या आत्महत्येचं ठोस कारण अद्याप समजलेलं नाही आहे.

कांगडाचे एसपी विमुक्त रंजन यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. वयाच्या 53 व्या वर्षी अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण बॉलिवूड हादरलेले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. अशी माहिती मिळते आहे की, आसिफ बसरा गेल्या 5 वर्षांपासून मॅक्डोलगंज मध्ये भाड्याच्या घरात राहत होते, त्यांच्याबरोबर त्यांची एक विदेशी मैत्रिण देखील राहत असे.

अशी माहिती मिळते आहे की, आसिफ बसरा UK मधील एका महिलेबरोबर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. गुरुवारी दुपारी ते त्यांच्या कुत्र्याला फिरवून आणण्यासाठी बाहेर गेलेले होते. घरी आल्यानंतर कुत्र्याच्या दोरीलाच त्यांनी गळफास घेतलेला आहे. अशी प्राथमिक माहिती मिळते आहे की, गेल्या काही काळापासून ते नैराश्याचा सामना करत होते. कांगडाचे एसपी विमुक्त रंजन यांनी या प्रकरणाची पुष्टी केली असून पोलीसया प्रकरणाचे सखोल चौकशी करत असल्याचे त्यांनी म्हटलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button