पिंपरी / चिंचवड

पाठीला जोरात चावा घेऊन मोबाईल पळवला

पिंपरी l प्रतिनिधी

पाठीला जोरात चावा घेऊन दोघांनी एका तरुणाच्या हातातून मोबाईल फोन पळवून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 3) मध्यरात्री दोन वाजता मामुर्डी येथे घडली.

अद्वैत प्रकाश माने (वय 18, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरबाज खान, कादिर खान उर्फ मौला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मामुर्डी येथील एका सोसायटी जवळ थांबले असताना आरोपी तिथे आले. आरोपी हे फिर्यादी यांच्या मैत्रिणीच्या ओळखीचे आहेत. आरोपींनी फिर्यादी यांचा मोबाईल फोन बघण्यासाठी मागितला. त्यावरून शिवीगाळ करून अरबाज याने फिर्यादी यांना दाताने चावा घेऊन त्यांचा सात हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button