TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘हजारो जत्रा पाहिल्या पण अशी जत्रा पाहिली नाहीः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • ‘वीस लाख लोकांना एकत्र आणण्याची जादू महेश दादांनी केली’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • इंद्रायणी थडी 2023 : महोत्सव समारोप समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा आमदार महेश लांडगेंवर कौतुकाचा वर्षाव

पिंपरी। महाईन्यूज । अमित शेळके

भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे आणि शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून इंद्रायणी थडी 2023 या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे समारोपासाठी राज्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महेश लांडगे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हजारो जत्रा पाहिल्या पण अशी जत्रा पाहिली नाही. महेश दादा काय पण करू शकतात, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं बालजत्रा आहे. ग्राम संस्कृती आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरा पुढे नेणारा हा उपक्रम आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

इंद्रायणी थोडीच्या समारोपाला मी आलो आहे. महेश दादांनी मोठा व्यासपीठ उपलब्ध करून दिला आहे. श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारली आहे. इकडे भजन महोत्सव, खाद्य महोत्सव सर्व पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी इंद्रायणी थडी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. मी जर आलो नसतो तर या महोत्सवाला मुकलो असतो. सन्मान नारी शक्तीचा, भारतीय संस्कृती या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. वीस लाख लोकांनी हजेरी लावली हे कमी नाही. अनेक महिलांना रोजगाराची संधी दिली. अशा महोत्सवाचा आयोजन ही काळाची गरज आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. आमचे सरकार काम करणारे सरकार आहे. सर्वसामान्य जनतेचे काम करणार सरकार आहे. सर्वसामान्य जनतेला काम देण्याचे काम हे सरकार करत आहे.

महेश लांडगे अपक्ष लढूनही जिंकले होते. महेश दादांनी माझी भेट घेतली होती. दाढीवाला पैलवान जिंकणार याची खात्री होती. ज्याला पारकच नाही तो काय करू शकतो, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. आता आपण एकच आहोत तुमच्यासाठी काम करणारा हा मुख्यमंत्री आहे. आपले सर्व आमदार काम करतात. वीस लाख लोकांना एकत्र आणण्याची जादू महेश दादांनी केली आहे. त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो. पिंपरी चिंचवडचा काया पालट आपल्याला करायचा आहे. या भव्य दिव्य महोत्सवातून अर्थव्यवस्थेची मोठी उलाढाल होत आहे. त्याला मी शुभेच्छा देतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button