breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पुणे तिथे काय उणे! हापूस आंबा मिळतोय हप्त्यावर, किती आहे EMI?

टीव्ही, फ्रिज, मोबाईल नंतर आता आंबे देखील हप्त्यावर

पुणे : पुण्यातील लोकांच्या भन्नाट कल्पना आपण नेहमीच चर्चेत असतात. असेच एक वेगळेपण म्हणजे पुण्यात आता आंबेही हप्त्यावर विकण्याचा निर्णय एका व्यावसायिकांने घेतला आहे. या विक्रेत्याने चक्क हप्त्यावर आंब्याची पेटी विक्री करण्यास सुरुवात केली आहे. सिंहगड रस्त्यावरील गुरुकृपा ट्रेडर्सचे गौरव सणस यांनी ही शक्कल लढवली आहे.

उन्हाळा आला की सगळेच आंबा खाण्यासाठी उत्सुक असतात. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आंबे खाण्याचा मोह होतो. मात्र सुरुवातीच्या काळात आंब्यांची आवक कमी असते त्यामुळे सर्वांना आंबे विकत घेणे शक्य नसते. सर्वसामान्य नागरिकांना हे आंबे घेणे परवडत नाही. हीच बाब लक्षात घेऊन ईएमआयवर आंबे विकावे अशी कल्पना त्यांना सुचली. त्यानंतर त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली.

गौरव सणस यांच्या दुकानावर आता येथे ईएमआय वर आंबे मिळतील असा बोर्ड लावण्यात आला आहे. आणि त्यांना प्रतिसाद ही मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

किती आहे EMI?

हापूस आंबा EMI वर खरेदी करायचा असेल तर काही अटी आहेत. त्या म्हणजे EMI वर आंबे खरेदी करायचा असेल तर बँकेचे डेबिट कार्ड अथवा क्रेडीट कार्ड आवश्यक आहे. संबंधित बँकच ग्राहकाला ३ ते १२ महिन्यापर्यंत हप्ते बांधून देते. त्यांच्याकडून काही ग्राहकांनी आंबे देखील विकत घेतलेले आहेत. एका ग्राहकाने ३० हजार रूपयांचे आंबे खरेदी केले आहेत. त्याला वर्षभरासाठी दरमहा २५०० रूपये हप्ता पडणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button