breaking-newsTOP News

गुड न्यूज : पवना धरण १०० टक्के भरले!

पिंपरी-चिंचवडकरांची चिंता मिटली :

पिंपरी। महान्यूज विशेष प्रतिनिधी ।

पिंपरी–चिंचवड शहरासह मावळ वासियांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचे पुनरागमन गेल्या आठवड्यात झाले व आठवडाभर चांगल्या पावसामुळे आज सकाळी धरण 100 टक्के भरले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने पाणीसाठा 3.11 टक्के जास्त आहे. शनिवारी दिवसभरात सकाळपासून ते आज सकाळी सहा वाजेपर्यंत 9 मिलिमीटर पाऊस झाला.

तसेच, आज सकाळपर्यंत एकूण 2166 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला एकूण पाऊस 2059 मिमी होता. त्यामुळे 107 मिमी पाऊस यावर्षी आजपर्यंत जास्त झाला आहे. तसेच, आजचा पाणीसाठा 100 टक्के आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 96.81 टक्के होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेने आजचा पाणीसाठा 3.11 टक्के जास्त आहे.
पिंपरी चिंचवड शहारासह मावळ तालु्क्यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्या स्रोत पवना धरण (Pavana Dam) आहे. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. शहरला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बांधऱ्यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करून शहवासियांना पाणी पुरवठा केला जातो.

पवना धरणातील परिस्थिती…
गेल्या 24 तासात झालेला पाऊस : 9 मिमी.
1 जूनपासून झालेला पाऊस : 2166 मिमी.
गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस : 2059 मिमी.
धरणातील सध्याचा पाणीसाठा : 100.00 टक्के
गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा : 96.89 टक्के
गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ : 0.02 टक्के
आजची पाण्याची आवक: 3.39 द. ल. घ. मी
आजपर्यंत पाण्याची आवक: 259.88 द. ल. घ. मी
धरणतील पाण्याचा उपयुक्त पाणीसाठा : 240.97 द. ल. घ. मी
धरणतील पाण्याचा एकूण पाणीसाठा : 272.11 द. ल. घ. मी
धरणातील पाणी पातळी: 613.26 मीटर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button