ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

बावधन परिसरात “समर शॉपिंग फेस्टिवल”च्या माध्यमातून बिजनेस प्रमोट करण्याची सुवर्णसंधी

पुणे : कोरोनानंतर शाळांचे वेळापत्रक बिघडले होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्या कधी मिळणार अशी चर्चा सगळीकडे सुरु होती. मात्र आता शिक्षण विभागाने शालेय विद्यार्थ्यांना खुशखबर मिळाली आहे. शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाकडून नुकताच पत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार राज्यातील शाळांना २ मे पासून ११ जून रोजी पर्यंत सुट्टी असणार आहे. उन्हाळ्याच्या हंगामात विद्यार्थ्यांना त्यांची लांबलचक सुट्टी मिळते आणि परीक्षेच्या लांबलचक कालावधीनंतर ते नेहमीच सर्व मनोरंजनाची मागणी करतात. अश्याच उन्हाळ्याचेऔचित्य साधत बावधन येथे तीन दिवसीय “समर शॉपिंग फेस्टिवल”चे आयोजन करण्यात आले आहे.

बावधन मध्ये ५, ६ आणि ७ मे दरम्यान “समर शॉपिंग फेस्टिवल”चे आयोजन करण्यात आले आहे. हा फेस्टिव्हल बावधन येथील, सूर्यदत्त कॉलेज शेजारील मैदानावर, सर्वांसाठी निशुल्क खुला असणार आहे. बावधन परिसरातील लोकांना मनसोक्त खरेदी आणि लज्जतदार पदार्थांची मेजवानी एकाच छताखाली अन् तेही तीन दिवस मिळणार आहे.

या ठिकणी एकाच छताखाली सर्वाना आवडणाऱ्या आणि परवडणाऱ्या वस्तू आपणास खरेदी करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने खास उन्हाळ्यातील कपड्यांचे कलेक्शन, किचन गार्डन, बनारसी साड्या, कॉटन साड्या, कांजीवरम, पैठणी, शोभेच्या वस्तू, ज्वेलरी, पंजाबी सूट्स, प्लाझो, फाब्रिक डिझाईनर साड्या, रेडी टू वेअर ब्लाऊज, कॉटन मेन्स शर्ट्स आणि किड्स वेअर, सुगंधी हॅन्डमेड सोप, ब्युटी प्रॉडक्ट्स, खान्देशी केळीचे वेफर्स, शेंगदाणा गुळपट्टी, शोभेच्या वस्तू, सोलापुरी चादर, महिला बचत गटांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तू, लोणच्यांचे विविध प्रकार, आंब्यांचे स्टॉल, दर्जेदार गावरान आणि घरगूती मसाले, पापड कुर्डाई, शोभेच्या वस्तू, रेडी टू कुक फूड्स, मातीची भांडी, बेडशीट असे स्टॉल असणार आहेत. या परिसरातील लोक मोठ्या संख्येने या शॉपिंग अँड फूड फेस्टिवलला भेट देत असतात. या मध्ये स्टॉल हवा असल्यास ९८५०३०४१६६ या नंबर वर संपर्क करावा. या माध्यमातून नक्कीच आपल्या व्यवसायाला बावधन परिसरातून चालना मिळेल.

लहान मुलांसाठी खास आकर्षण

उन्हाळ्याच्या हंगामात विद्यार्थ्यांना त्यांची लांबलचक सुट्टी मिळते आणि परीक्षेच्या लांबलचक कालावधीनंतर ते नेहमीच सर्व मनोरंजनाची आणि करमणुकीची मागणी करतात. या फेस्टिव्हल मध्ये लहान मुलांसाठी खास आकर्षण असणारे लांब पायाचे स्टिल्ट वॉकर,आणि जोकर यांची लहान मुलांच्या करमणुकीसाठी तसेच जम्पिंग आणि किड्स बॉऊन्सिंग टोटली फ्री असणार आहे. बच्चे बच्चे कंपनीला कंपनीला बर्फाचा गोळा, आईस्क्रीम, कुल्फी, थंडगार सरबत पिण्याचा आनंदही घेता येणार आहे. त्याच बरोबर थोरामोठांसाठी “ये शाम मस्तानी” हा सदाबहार गाण्यांचा प्रोग्रॅमही असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button