breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

सोनं आजही महागलं; जाणून घ्या दर

नवी दिल्ली | टीम ऑनलाइन

भारतीय सराफा बाजारात आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं महागलं. सोन्याच्या दरात १०४ रुपयांची वाढ झाली. ऐन लग्नसराईत झालेली ही वाढ सर्वसामान्यांची चिंता वाढविणारी आहे.सराफा बाजारात सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८ हजार १९० रुपयांवर बंद झाला आणि आज ४८ हजार २९४ रुपयांवर उघडला. तर २३ कॅरेट सोन्याची किंमत ४८ हजार १०१ इतकी आहे आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत ४४ हजार २३८ इतकी व १८ कॅरेट सोन्याची किंमत ३६ हजार २२१ इतकी आहे. तसेच आज १४ कॅरेट सोन्याचा दर २८ हजार २५२ रुपये इतका आहे.

तज्ज्ञांच्या मतानुसार, अमेरिकेत महागाई वाढल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे. नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेतील महागाई दर ६.८ टक्के इतका वाढला. मागील ४० वर्षांतील ही एका वर्षातील सर्वाधिक महागाई आहे. त्यामुळेच महागाईपासून वाचण्यासाठी सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button