पिंपरी / चिंचवड

पूर्ववैमनस्यातून मिरची पावडर डोळ्यात टाकून तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी l प्रतिनिधी

जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून एका तरुणाच्या डोक्यात आणि डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्यावर कोयत्याने वार केले. याप्रकरणी तिघांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 3) सकाळी पावणे अकरा वाजता मुंबई-पुणे महामार्गावर बावधन येथे सीएनजी पंपावर घडली.

सुरज गोरख क्षीरसागर (वय 23, रा. कोथरूड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज उर्फ सोन्या कुडले (वय 30, रा. कोथरूड) आणि अन्य दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुंबई-पुणे महामार्गावर बावधन येथे एका सीएनजी पंपावर काम करतात. अर्पी सुरज याच्यासोबत फिर्यादी यांचा मागील काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. सुरज याच्या सांगण्यावरून अन्य दोन आरोपींनी फिर्यादी यांच्या तोंडाला व डोळ्याला मिरची पावडर लाऊन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button