ताज्या घडामोडीराष्ट्रिय

इंधन दरवाढ सुरूच! पेट्रोल ७०, डिझेल ८० पैसे लिटरने महागले

नवी दिल्ली  |  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची दरवाढ सुरू आहे. त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांनी आज पुन्हा इंधन दरवाढ केली. त्यात पेट्रोल ७० पैसे आणि डिझेल ८० पैसे लिटरने महागले. यामुळे ५ दिवसांत पेट्रोल आणि डिझेल ३.१० रुपयांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोल ८४ पैशांनी महागल्यामुळे ते ११३ रुपये ३५ पैसे आणि डिझेल ९७ रुपये ५५ पैसे लिटर झाले आहे.

भारतीय तेल कंपन्यांनी आज सकाळी इंधनाचे सुधारित दर जाहीर केले. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल ९८ रुपये ६१ पैसे आणि डिझेल ८९ रुपये ८७ पैसे लिटर झाले आहे. कोलकात्यात पेट्रोल १०८ रुपये ०१ पैसे आणि डिझेल ९३ रुपये ०१ पैसे लिटर झाले. तर चेन्नईत पेट्रोल ७६ पैशांनी महागले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button