breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई – मध्य रेल्वेच्या हार्बर मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार असून पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी- रविवारीच्या मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्याचे नियोजम असल्याने या मार्गावर रविवारी दिवसा ब्लॉक नसेल मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर सीएसएमटी -चुनाभट्टी/ वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4 .40 वाजेपर्यंत रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत अप- डाऊन धीम्या मार्गावरील वाशी-बेलापूर-पनवेल- सीएसएमटी वडाळा रोड आणि सीएसएमटी -वांद्रे – गोरेगाव दरम्याच्या लोकल सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नयेत, याकरिता मध्य रेल्वेकडून पनवेल आणि कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 8 वरून विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-वाशी-नेरुळ अप व डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. या ब्लॉककालावधीत वाशी-नेरुळ-पनवेलसाठी ठाणे स्थानकावरून सुटणाऱ्या आणि पनवेल- नेरुळ-वाशी येथून ठाण्याकरिता सुटणाऱ्या सर्व लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button