TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

सोशल मीडियावर मैत्री, मग लग्न करण्यासाठी तगादा, कंटाळून तरुणीची पोलिसांत धाव

अमरावती: समाजमाध्यमावर युवतीशी मैत्री करून तिला ‘तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझ्या घरी येऊन तमाशा करेन’ अशी वारंवार धमकी युवकाने दिली. इतकेच नव्हे, तर भर रस्त्यात तिचा हात पकडून विनयभंग केला. समाजमाध्यमावरून तिचे मित्र आणि नातेवाइकांचे मोबाईल क्रमांक घेऊन त्यांनाही शिवीगाळ करत धमकी दिली. यामुळे त्रस्त झालेल्या युवतीने पोलिसात युवकाविरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी ओम गजानन मिटकरी (वय २१) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

समाज माध्यमावरून वर्षभरापूर्वी त्याची पीडित युवतीशी ओळख झाली. मार्च २०२१ मध्ये त्याने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिने ती एक्सेप्ट केली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री देखील झाली. ऑनलाईन मैत्री झाल्यानंतर अवघ्या दहा ते बारा दिवसातच तो युवतीच्या घरी आला. त्यावेळी त्याने तिला सहजच भेटायला आलो, असे सांगितले.

दरम्यान, त्यानंतर युवतीने त्याला घरी येण्यास नकार दिल्यानंतरही तो जबरदस्तीने तिच्या घरी जात होता. याबाबत तिने कुटुंबियांना सांगितले. त्यांनी युवकाची समजूत घातली. तरीही तो युवतीचा पाठलाग करत होता.

रस्त्यात गाठून हात पकडून तिचा विनयभंगही केला. तरीही युवती त्याला बघत नसल्याने तो तिच्या नातेवाईकांना मारून टाकण्याची धमकी देत होता. इतकेच नव्हे, तर समाज माध्यमांवरून तिचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींचे मोबाईल नंबर घेऊन त्यांना शिवीगाळ करीत धमकी तो द्यायचा. मध्यरात्री फोन करून तिला जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देत बोलण्यास बाध्य करायचा.

सतत वर्षभरापासून सुरू असलेल्या या प्रकाराने त्रस्त झालेल्या युवतीने फ्रेजरपूरा पोलीस ठाणे गाठून युवकाविरुद्ध तक्रार दाखल केली. फ्रेजरपुरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button