पिंपरी / चिंचवड

ओएलएक्सवर फ्रीज विकणे पडले महागात : ऑनलाईन ठगाने केली फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

घरातील फ्रिज ओएलएक्सवर विकण्यासाठी जाहिरात दिली असता एका अनोळखी व्यक्तीने फ्रीज खरेदी करण्याच्या बहाण्याने संपर्क करून व्यक्तीला क्यूआरकोड स्कॅन करायला लावत 26 हजारांची फसवणूक केली. ही घटना 11 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी चार वाजता कस्पटे वस्ती वाकड येथे घडली.

केवल गौरंगभाई देसाई (वय 31, रा. कस्पटेवस्ती, वाकड. मूळ रा. गुजरात) यांनी 24 फेब्रुवारी रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9883432464 या क्रमांकावरून बोलणा-या अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी देसाई यांना त्यांच्या घरातील जुना फ्रीज विकायचा असल्याने त्यांनी आठ हजार रुपयांना फ्रीज विकण्याबाबत जाहिरात ओएलएक्स या वेबसाईटवर दिली. एका अनोळखी व्यक्तीने 9883432464 या क्रमांकावरून देसाई यांना फोन केला. देसाई यांचा विश्वास संपादन करून त्याचा क्युआर कोड देसाई यांना पाठवला. त्याआधारे आरोपीने देसाई यांच्या बँक खात्यातून 26 हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून ट्रान्सफर करून फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक मसाळ तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button