breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड व यश पॅथॉलॉजीतर्फे विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी

पिंपरी: प्रतिनिधी
आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी व यश पॅथॉलॉजीचे डॉक्टर विजय यादव यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीच्या विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. त्यास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून लायन्सचे झोन चेअरपर्सन लायन भरत इंगवले तसेच लायन प्राध्यापक अमृतराव काळोखे, लायन दामाजी आसबे, अध्यक्ष लायन अविनाश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमा प्रसंगी अमृतराव काळोखे यांनी पाचवी ते आठवी व इतर वर्गातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप चे बुक्स भेट स्वरूपात दिले. तसेच भरत इंगवले यांनी ज्ञानेश्वर विद्यालयात १० वी मध्ये अनुक्रमे प्रथम येणाऱ्या तीन मुलींना मोफत सायकली देण्याचे आश्वासन दिले व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत मार्गदर्शन केले . रक्तगट तपासणी चे महत्व दामाजी आसबे यांनी सांगितले . लायन्स क्लब पिंपरी चिंचवड च्या वतीने अध्यक्ष अविनाश कुलकर्णी प्रकरणी यांनीही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे लायन कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुंगसे सर, पी डी कुलकर्णी , मुलाणी सर ,पवार मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button