TOP NewsUncategorizedपिंपरी / चिंचवड

तोतया पोलीस बनून लोकांची फसवणूक करणारे चोरटे जेरबंद; चिंचवड पोलिसांच्या कारवाईत १४ वाहनांसह ७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पिंपरी महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

तोतया पोलीस बनून बनावट कागदपत्रे आणि बनावट पोलीस ओळखपत्र दाखवुन लोकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरट्यांकडून १४ वाहनांसह सुमारे ७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दिपक नारायण बनसोडे (वय ३१, रा.देहुरोड) व श्रीमंत विनायक सुरवसे (वय २९, रा.चिंचवड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिस उप आयुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस गस्त घालत असताना त्यांना खबर मिळाली की, दोघेजण वाल्हेकरवाडी येथे चोरीची दुचाकी घेऊन थांबले आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे पोलिसांचा खोटा गणवेश व चोरीच्या ६ लाख ९६ हजार रुपयांच्या १४ दुचाकी पोलिसांनी जप्त करण्यात आल्या.

पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी केवळ दुचाकी चोरल्या नाहीत, तर खोटा पोलीस गणवेश घालून नागरिकांना पोलीस असल्याची खोटी बतावणी करत त्यांची लूट केल्याचेही मान्य केले. यावेळी पिंपरी-चिंचवड तसेच पुणे आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात केलेले एकूण १० गुन्हे उघड झाले. यात चिंचवड पोलीस ठाण्यातील पाच, सांगवी, फरसखाना व विमाननगर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक, तर निगडी पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघड झाले असून जप्त केलेल्या चार दुचाकींच्या गुन्ह्यांचा शोध अजून पोलीस घेत आहे.

ही करवाई चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे व शंभू रणवरे, सहायक पोलीस फौजदार पांडुरंग जगताप, आर.बी. नरवडे,पोलीस हवालदार धर्मनाथ तोडकर, पोलीस अंमलदार रोहीत पिंजरकर, उमेश मोहिते, उमेश वानखेडे, रहीम शेख, पंकज भदाणे, गोवींद डोके, अमोल माने, कल्पेश पाटील, गजानन आडके यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button