breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा मायदेशी परतण्यास नकार

लंडन – भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या खटल्यांचा सामना करत असलेले आणि उपचारासाठी परदेशी जाण्याची परवानगी मिळालेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी प्रकृतीच्या कारणावरून पाकिस्तानला पुन्हा परतण्यास नकार दिला आहे. ‘डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मला विमान प्रवास करता येत नाही आणि कोविडच्या धोक्यापासून वाचण्यासाठी रुग्णालयाजवळच राहण्याचा सल्ला दिला आहे’, असे सांगून पाकिस्तानला परतण्यास आपण असमर्थ असल्याचे शरीफ यांनी लाहोर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे.

पाकिस्तानचे ७१ वर्षांचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ नोव्हेंबर २०१९ पासून लंडनमध्ये राहत आहेत. वैद्यकीय उपचारासाठी त्यांना ४ आठवड्यांसाठी लंडनला जाण्याची परवानगी लाहोर उच्च न्यायालयाने दिली होती. मात्र आता ‘विमानासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे. याशिवाय कोरोनापासून वाचण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे सध्या मी पाकिस्तानला परतू शकत नाही’, असे नवाज शरीफ यांनी लाहोर उच्च न्यायालयात सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे. सोबत त्यांनी ब्रिटनचे डॉक्टर लॉरेन्स यांचा वैद्यकीय अहवाल जोडला आहे. दरम्यान, नवाज शरीफ यांचा नातू मोहम्मद जुनैद सफदर याचे २२ ऑगस्टला लंडनमध्ये लग्न होणार आहे. या लग्नाला नवाज शरीफ उपस्थित राहतील, असे शरीफ यांची मुलगी मरियम नवाजने ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button