ताज्या घडामोडीपुणे

पुण्यात जबरी घरफोडी, पावणे दोन कोटींचा ऐवज लंपास

पुणे | पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरट्यांनी एक बंद असणाऱ्या बंगल्यातून दीडशे तर याहून अधिक सोने-चांदी परदेशी चलन असा तब्बल पावणे दोन कोटींचा ऐवज चोरून नेला आहे. या जबरी चोरीने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे विवेक चोरघडे हे काही कामानिमित्त बंगल्याला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरात ठेवलेले सोन्याचे दागिने चांदी परदेशी चलन आणि इतर ऐवज असा दीड ते पावणे दोन कोटी रुपयांचा ऐवज चोरून नेला.

विवेक चोरघडे हे पिढीजात शेतकरी आहे, ते बागायतदार आहेत. आकाश लॉन्स परिसरात यांचा बंगला आहे. काही कामानिमित्त बंगल्याला कुलूप लावून ते बाहेर गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधली.दरम्यान पुणे शहरात घरफोडीचे प्रकार रोज सुरू आहेत. चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. दररोज लाखांच्या घरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना कोट्यवधी रुपयांचा ऐवज चोरून नेला यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button