breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

“चार ते पाच महिन्यापुरती…”, शिवेंद्रराजेंचं उदयनराजेंबद्दल मोठं विधान

मुंबई |

निवडणुका जवळ आल्या की खासदार उदयनराजेंना इनोव्हेटिव्ह साताऱ्याचं स्वप्न पडतं. सातारा नगरपालिका ही भ्रष्टाचाराचं कुरण झाली असून नुसत तिथ चरायचं आणि आपले खिसे भरायचे एवढंच सुरु आहे अशी टीका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चार पाच महिन्यापुरती ही इनोव्हेटिव्ह योजना आहे असं सांगताना शिवेंद्रराजेंनी शाश्वत विकासाठी आपल्याला संधी द्या असं आवाहन केलं. “निवडणुका आल्या की वातावरण निर्माण करणं, गैरसमज पसरवणं सुरु असतं. सातारा विकास आघाडीच्या कामाबद्दल लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. विरोधकांनी आरोप करण्याऐवजी यांचेच नगरसेवक पदाधिकाऱ्यांवर पैसै खाल्ल्याचे आरोप करत आहेत. सातारकरांनी सर्व पाहिलं आहे,” असं शिवेंद्रराजे म्हणाले.

“सातारा पालिकेची निवडणूक जवळ आली की वातावरण निर्मितीसाठी खासदार उदयनराजे भोसले नेहमीच स्टंटबाजी करून सातारकरांना विकासाची खोटी स्वप्नं दाखवतात. सातारकरांना त्यांच्या खोटेपणाची जाणीव झाल्याने त्यांना सातारा विकास आघाडीचा पराभव दिसू लागला आहे. यामुळे खासदार सध्या कोट्यवधींच्या विकासकामांची खोटी स्वप्नं दाखवत आहेत. मात्र हा देखील विकास नुसता कागदावरच पाहायला मिळणार आहे,” अशी टीका शिवेंद्रराजेंनी केली आहे. “निवडणूक जवळ आल्याने अब्जावधी रुपये विकासासाठी येत आहेत. पण हे पैसे कागदावरुनच परत जातील. पाच वर्ष संधी देऊनही साताऱ्यात नवीन काही झालेलं नाही. कोणत्याही आश्वासनांना बळी पडू नका,” असं यावेळी ते म्हणाले.

  • काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे बाईट…

“सागर” लाड तुम्ही आव्हान दिले होते तुमचे आव्हान स्वीकारून मी सागर बंगल्यावर पोहोचलो महाराष्ट्र द्रोह्यांचा निषेध केला. पोलिसांनी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला तरीही एकदा नाही तर अनेकदा महाराष्ट्रद्रोह्यांचा निषेध केला. तुम्ही म्हणाले होते सागर बंगल्यावर आलात तर परत जाऊ देणार नाही मी परतही आलो पण तुम्ही काही दिसला नाहीत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button