breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

Self Confidence | आत्मविश्वास वाढविण्यासाठी ‘या’ ५ टिप्स फॉलो करा

Self Confidence | मानसिक आरोग्यासाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. आत्मविश्वास कमी असलेल्या लोकांना स्टेजवर जाऊन एखाद्यासमोर बोलण्यात किंवा प्रेझेंटेशन देण्यात खूप अडचणी येतात, पण याउलट आत्मविश्वास असलेल्या लोकांसाठी हे काम अगदी सोपं असतं. जर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर ‘या’ ५ टिप्स फॉलो करा.

अतिविचार करू नका : जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल तर तुम्ही इतर गोष्टींचा अतिविचार करण्याची सवय सोडली पाहिजे. कारण निरर्थक गोष्टींचा विचार करण्याची सवय तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवते.

छोट्या गोष्टींपासून बदल करा : प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही आधी लहान गोष्टींपासूनच होते. यासाठी आधी मित्र-मंडळींसमोर आत्मविश्वासाने बोला. असे करून तुमच्या मनातील भीती कमी होईल.

हेही वाचा    –    इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा; ‘या’ युवा खेळाडूला संधी

स्वतःची इतरांशी तुलना करू नका : दुसऱ्याच्या जीवनशैलीची आणि विचारांची तुमच्याशी तुलना करू नका. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये एक गुण असतो ज्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. पण जर आपण स्वतःची किंवा आपल्या कामाची तुलना दुसऱ्या कोणाशी केली तर त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो.

स्वतःवर विश्वास ठेवा : आयुष्यात काही मिळवायचे असेल तर स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. जर आपला स्वतःवर विश्वास असेल तरच आपण आपले विचार इतरांसमोर उघडपणे मांडू शकता. यासाठी आधी स्वत:वर विश्वास ठेवा.

संयम ठेवा : तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात एखादा चांगला बदल हवा असेल तर त्यासाठी संयम ठेवणं फार गरजेचं आहे. संयम ठेवल्याने अनेक गोष्टी साध्य करता येतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button