breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

लोकसंवाद : बारा गाव दुसरी, तेव्हा एक गाव भोसरी ; आमदार महेश लांडगेंच्या कार्याचा बिहारमध्ये ‘डंका’

भारतीय जनता पार्टीचे शहराध्‍यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी आपल्या कार्यक्षत्रेता उल्लेखनीय काम केले आहे. कोविड महामारी,  पश्चिम महाराष्ट्रातील पुरपरिस्थिती, कोकणातील चक्रीवादळ अशा आपत्तीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणारा लोकप्रतिनिधी… असा लौकीक आमदार लांडगे यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे मिळवला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या कार्याची दखल घेतली जातेच. आता राज्याबाहेर बिहारमध्येसुद्धा आमदार लांडगे यांच्या कार्याबद्दल कौतुकाचे चर्चा केली जाते. याबाबत गांधी फेलोशीपचे प्रोग्राम लीडर श्री. संदेश थोरवे यांनी आपला अनुभव कथन केला आहे. तो ‘महाईन्यूज’च्या वाचकांसाठी त्यांच्याच शब्दांत…

थेट गांधी फेलोशिपच्या डायरीतून :

नवादाचे पीएल मृणाल सर, गयाचे पीएल विवेक सर, भागलपूरच्या पीएल अनन्या मॅडम, अ‌ॅलेन, जागृती, शिव, धिरल आणि मी पी अ‌ॅन्ड मॉलच्या दिशेने चालत निघालो होतो. त्यावेळी रात्रीचे ९:२५ वाजले होते. तेव्हा आम्ही बिहारमधील रात्रीची थंडी अनुभवत होतो. मी सोडून सर्वजण कन्नड “कांतारा” चित्रपट पाहायला थेटरात चालले होते. जागृती आणि मृणाल सर सर्वात पुढे, त्यांच्या थोडं मागे अनन्या मॅडम, धिरल आणि शिव तर सर्वात पाठीमागे विवेक सर, अ‌ॅलेन आणि मी निवांत चाललो होतो. चित्रपट पाहायला जायची कल्पना जागृतीची होती, त्यामुळे बहुधा ती सर्वात पुढे चालत होती.

फाट्यावरील रस्ता ओलांडून विवेक सरांनी मला विचारले,“आप मूवी देखने क्यो नहीं आ रहे?”

त्यांच्याकडे पाहत मी मिश्कीलपणे उत्तर दिले,“मै देखने जाऊ ऐसा कोई मूवी ही बनता नहीं.”

हे ऐकून ते जोरात हसू लागले आणि नंतर मी पण खूप हसलो.

काही वेळात आम्ही मॉलच्या बाहेर पोहोचलो. अ‌ॅलेनने त्याची लॅपटॉप बॅग माझ्याजवळ दिली. त्यानंतर ते सर्व आत गेले. माझ्याजवळ आता दोन बॅग होत्या. मग मी रस्ता ओलांडला. तिथे लगेच एक इलेक्ट्रिक रिक्षा आली.

मी त्यांना म्हणालो,“राजीवनगर, १२ ए रोड.”

ते माझ्याकडे पाहत म्हणाले,“८० रूपये”

मग मी बॅग सांभाळत म्हणालो,“६० रूपये”

मी त्यांना ६० रूपये म्हणत होतो. ते मला ८० रूपये म्हणत होते. काही सेकंद मी बाजू रेटत होतो तर ते त्यांची बाजू रेटत होते. अखेर ७० रूपये देण्याचे ठरले. तेव्हा कुठे मी रिक्षात बसलो.

रिक्षा चालवत त्यांनी मला विचारले,“आप महाराष्ट्र से हो ना?”

हे ऐकून मला नवल वाटले.

मी क्षणाचाही विलंब न करता लगेच “हो” उत्तर दिले.

त्यांच्याकडे पाहत मी विचारले,“आपको कैसे पता चला?”

त्यानंतर ते जोरात हसू लागले. त्यांच हसणं खूप भारी होतं, ते पाहून मी देखील हसायला लागलो.

मग ते म्हणाले,“आपकी टोन से ! महाराष्ट्र में कहा से?”

असं विचारून ते पुन्हा हसू लागले. त्यांच्या प्रश्नाने माझी उत्सुकता अजून वाढली. कारण जणू ते आपल्या इकडचेच आहे की काय असे मला वाटू लागले.

मी पटकन उत्तर दिले,“पिंपरी-चिंचवड.”

“पिंपरी-चिंचवड में कहा से?” असं त्यांनी झटकन विचारले.

त्यानंतर ते पुन्हा जोरजोरात हसू लागले. आता तर मी चक्रावलोच. यांना एवढं कसे काय माहित? हे पिंपरी-चिंचवडचे आहेत? हे बिहारमध्ये काय करत आहे? असे अनेक प्रश्न मनात पडले.

मनातल्या या सगळ्या प्रश्नाचे जाळे बाजूला करत मी उत्तर दिले,“भोसरी.”

मी आता कान लावून त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागलो.

त्यानंतर त्यांनी सांगितले की, मोशीत घर बांधण्यासाठी आम्ही जागा घेतली आहे.

हे ऐकल्यावर मी विचारले,“आप भोसरी से हो?”

त्यावर त्यांनी नकारार्थी मान डोलावली.

“मेरा एक रिश्तेदार उधर भोसरी में वेल्डिंग का काम करता है. ऐसे ही वो एक दिन बोला की, इधर फ्लॅट लेते है. फिर हमने उधर मोशी में घर के लिए जगह ली है.” असे त्यांनी मला अभिमानाने सांगितले.

रस्त्यावरून गाडी डावीकडे वळवत ते म्हणाले,“आपके एमएलए बहुत ही अच्छे है.”

मी त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणालो,“आमदार महेशदादा लांडगे?”

त्यावर ते होकारार्थी मान डोलावत म्हणाले,“जी, जी.”

आता माझ्या मनात पुन्हा प्रश्नांचे वादळ सुरू झाले. तेवढ्यात माझ्या कानांवर पल्सरचा हॉर्न पडला, तसा मी भानावर आलो.

त्यांच्या गाडीचा हॉर्न वाजवत ते म्हणाले,“हमने वडमुखवाडी में ग्रोसरी का नया दुकान शुरू किया. उसका नाम ‘शिव’ है. उसके उद्घाटन के लिए एमएलए महेश लांडगेजी को बुलाने का सोच रहा था. हमको लगा की वो नहीं आएंगे. फिर एक दिन हम उनके ऑफिस में गये. लांडगेजी निमंत्रणपत्रिका देख के बहुत ही खुश हुए. मै जरूर आऊंगा, ऐसा उन्होने खुशी से कहा. और उसके बाद सच में ओ दुकान के उद्घाटन के लिए आ गये.”

ही गोष्ट ते अतिशय आनंदाने सांगत होते. हे ऐकून माझ्या मनात कल्पना रंगू लागल्या. भोसरीचे म्हणजेच “बारा गाव दुसरी, तेव्हा एक भोसरी” दमदार आमदार पैलवान महेशदादा आहेतच तसे ! असं म्हणून मी दंड थोपटले.  त्यावेळी रात्रीच्या मंद गार वाऱ्याची एक झुळूक मला स्पर्शून गेली. तेव्हा मी भानावर आलो.

गाडीचा वेग थोडा वाढवत ते म्हणाले,“एक बार उधर पाणी के पाईपलाईन का काम हो नहीं रहा था, फिर मै लांडगेजी के पास गया था. उसके बाद मेरा काम तुरन्त से हो गया.”

पुन्हा ते जोरात हसू लागले.

हसता-हसता त्यांनी मला विचारले,“आप इधर कैसे?”

मग त्यांना मी थोडक्यात गांधी फेलोशिपबद्दल सांगितले.

सीटवर व्यवस्थित बसत मी म्हणालो,“महेशदादा से मै भी दोन बार मिला हूँ. दोनो बार मिलके मुझे अच्छा लगा. उनका जनसंपर्क बहुत ही ज्यादा है.”

त्यावर त्यांनी होकारार्थी मान डोलावली.

आपण जिथे राहतो, तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेली कामे, तिथल्या विविध गोष्टींचे कौतुक एखाद्या दुसऱ्या राज्यातील व्यक्तीच्या तोंडून ऐकण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तेव्हा मला खूपच समाधान वाटले. त्यावेळची भावना आणि तो क्षण माझ्यासाठी खूपच विशेष होता.

– संदेश संजय थोरवे.

टीप : यात पीएल म्हणजे प्रोग्रॅम लीडर. जे एका जिल्ह्याचे प्रमुख असतात आणि ते तेथील सर्व काम पाहतात. आम्ही सर्व गांधी फेलो पीएलच्या मार्गदर्शनाने नेमून दिलेल्या ठिकाणी काम करत असतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button