पिंपरी / चिंचवड

बँक अकाउंटला पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने पाच लाखांची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

एसबीआय बँकेचे नेट बँकिंग अकाउंट सस्पेंड होणार असून अकाउंटला पॅनकार्ड अपडेट करा, असे सांगत अज्ञात व्यक्तीने भोसरी येथील एका व्यक्तीच्या बँक खात्यातून पाच लाख रुपये उडवले. ही घटना शनिवारी (दि. 5) दुपारी सव्वा एक वाजता एसबीआय बँक, भोसरी शाखेत घडली.

अशोक विठ्ठलराव मडावी (वय 50, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9163106302 या क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने 9163106302 या क्रमांकावरून फिर्यादी यांच्या फोनवर खोटी लिंक पाठवली. त्यात ‘एसबीआय बँकेचे नेट बँकिंग अकाउंट आज सस्पेंड होणार आहे. तुमचे पॅनकार्ड अपडेट करा’ अशा आशयाचा इंग्रजीत मेसेज पाठवला. फिर्यादी यांनी लिंकवर क्लिक करून त्यात माहिती भरली असता अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या एसबीआय बँकेच्या अकाउंटमधून चार लाख 95 हजार 801 रुपये ट्रान्सफर केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button