ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड, हिंजवडी, तळेगाव एमआयडीसीमध्ये पाच घरफोड्या; सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

चाकण | चिंचवड, हिंजवडी आणि तळेगाव एमआयडीसी परिसरात घरफोडीच्या पाच घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये चोरट्यांनी तीन लाख 27 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.पहिल्या प्रकरणात महादेव हरी आल्हाट (वय 42, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातून 71 हजार रुपये किमतीचे 15 ग्रॅम सोन्याचे दागिने व एक हजाराची रोकड चोरून नेली. घरफोडीचा हा प्रकार 10 ऑगस्ट रोजी रात्री सव्वादहा ते 11 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान घडला.

दुसऱ्या प्रकरणात बापूसाहेब अंकुश मोढळे (वय 45, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे घर कुलूप लावून बंद असताना चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चांदीचे दागिने, वस्तू तसेच रोख रक्कम असा एकूण 50 हजारांचा ऐवज चोरून नेला. घरफोडीचा हा प्रकार रविवारी (दि. 22) दुपारी दोन ते सोमवारी (दि. 23) सकाळी सकाळी पावणेदहा या कालावधीत घडला.तिसऱ्या प्रकरणात रघुनाथ रामदास बोडके (वय 51, रा. माण, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे घर कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले. घरातून 40 हजार रुपये रोख व 57 हजाराचे सोन्याचे दागिने, असा एकूण 97 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

चौथ्या प्रकरणात मगन धनाजी रायका (वय 60, रा. चिखली) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून गॅस, शेगड्या, सिलेंडर, स्टीलची भांडी, प्लेट, वाट्या, लहान-मोठी पातीली, असे 94 हजार 150 रुपये किमतीचे घरगुती साहित्य चोरट्याने चोरून नेले. घरफोडीचा हा प्रकार शनिवारी (दि. 21) रात्री एक ते पहाटे पाचच्या दरम्यान घडला.पाचव्या प्रकरणात जितेंद्र निल्लपा साखरे (वय 25, रा. ताथवडे) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीचे पुनावळे येथील कोयते वस्ती येथे हॉटेल इन्फिनिटी कॅफे या नावाचे हॉटेल आहे. फिर्यादीने रविवारी (दि. 22) रात्री दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे हॉटेल बंद केले. अज्ञात चोरट्यांनी हॉटेलचे लोखंडी शटर उचकटून हॉटेलमध्ये प्रवेश केला. गल्यातील 11 हजार 800 रोख व पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल, असा 16 हजार 800 रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. घरफोडीचा हा प्रकार सोमवारी (दि. 23) सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button