breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

इराकी रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डात भीषण आग; ५० रुग्णांचा होरपळून मृत्यू

बगदाद – सोमवारी रात्री एका अतिशय वाईट घटनेने इराक हादरले. येथील एका रुग्णालयाच्या कोविड वॉर्डमध्ये भीषण आग लागून ५० रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. सोमवारी रात्री उशिरा इराकच्या दक्षिण भागात असलेल्या नसीरिया शहरातील अल-हुसेन रुग्णालयात ही आग भडकली. याबाबत वेळीच माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली, मात्र २ आरोग्य कर्मचाऱ्यांसह अनेक रुग्णांनी आगीत आपला जीव गमावला. तसेच जखमींचा आकडाही मोठा असल्याने मृतांच्या आकड्यात भर पडत आहे. कोविड वॉर्डमधील ऑक्सिजनच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र पोलीस या आगीचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर पंतप्रधान मुस्तफा अल-कदिमी यांनी तातडीने वरिष्ठ मंत्र्यांची बैठक घेतली. तसेच नसीरिया रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थापकांना निलंबित करून अटकेचे आदेश देण्यात आले आहेत.

या अपघातानंतर, आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड रुग्णालयातून अनेक रुग्णांचे जळलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढले, तर अनेक रुग्ण धुरामुळे गुदमरून बेशुद्धावस्थेत आढळले आहेत. त्यांपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढू शकते. तसेच बरेच लोक अद्याप बेपत्ता असल्याची माहितीही समोर आली आहे. आरोग्य विभागाचे प्रवक्ते आमिर जमीली म्हणाले की, ही घटना घडली तेव्हा वॉर्डमध्ये ६३ रुग्ण दाखल होते.

दुर्दैव म्हणजे इराकमधील रुग्णालयात आगीमुळे इतक्या मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची ही वर्षभरातील दुसरी घटना आहे. यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला बगदाद येथील एका कोरोना रुग्णालयात भीषण आग लागली होती. ज्यामध्ये ८२ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर ११० जण गंभीर जखमी झाले होते. युद्ध आणि निर्बंधांमुळे अगोदरच इराकची आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे. त्यामुळे कोरोना लढाईत अनेक अडचणी येत आहेत. त्यातच वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने इराकच्या रुग्णालयांमधील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button