breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

45 वर्षावरील नागरिकांना कोविशिल्डचा दुसरा डोस, लसीकरण केंद्रावर गर्दी

पिंपरी / महाईन्यूज 

कोविड 19 प्रतिबंधक लसीचा ज्यांनी पहिला डोस घेतला आहे. त्यांना दुसरा डोस देण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे कोविशिल्ड लसीचे पाच हजार डोस प्राप्त झाले आहेत. 45 वर्षावरील दुसरा डोस घेणा-या नागरिकांना लसीकरण केंद्रांवर लस देण्यात येत आहे, अशी माहिती पालिकेने कळविली आहे.

कोविड-१९ आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या संरक्षणासाठी ससीकरण करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोविशिल्ड लस ५००० डोस प्राप्त झाले आहेत. फक्त वय वर्षे ४५ वर्षापुढील नागरीकांनी पहिला डोस घेतलेला आहे, त्याच नागरीकांनी दुसरा डोस घेण्यासाठी आज लसीकरण केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

भोसरी- सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, छत्रपती शाहू महाराज शाळा दिघी, संत ज्ञानेश्वर क्रिडा संकुल इंद्रायणीनगर, पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालय च-होली, प्राथमिक शाळा मोशी, सांगवी- कासारवाडी दवाखाना, पिंपळे गुरव माध्यमिक शाळा पिंपळे गुरव, शितोळे शाळा सांगवी, बालाजी लॉन्स सांगवी, गणेश इंग्लिश मिडियम स्कुल दापोडी, तालेरा- तालेरा रुग्णालय, बिजलीनगर दवाखाना, किवळे दवाखाना, गुरुव्दार वाल्हेकरवाडी, मनपा शाळा वाल्हेकरवाडी, मनपा शाळा पुनावळे, सेक्टर २९ रावेत, आकुर्डी- हेगडेवार भवन, संजय काळे, आरटीसीसी, जाधववाडी, चिखली, थेरगांव- मनपा शाळा वाकड, मंगलनगर शाळा, भुमकरवस्ती शाळा, यशवंतराव चव्हाण स्कुल ग प्रभाग, कस्पटेवस्ती शाळा, वायसीएम रुगणालय, नेहरुनगर दवाखाना, जिजामाता- अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, काळेवाडी पवनानगर शाळा, यमुनानगर-  यमुनानगर रुग्णालय, स्केटींग ग्राऊंड सेक्टर २१, प्राथमिक शाळा म्हेत्रेवस्ती या लसीकरण सुरू आहे.

प्रत्येक लसीरकण केंद्राच्या ठिकाणी मर्यादित नागरीक/लाभार्थी यांना लसीकरण करण्यात येणार आहे. नागरीकांनी लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गर्दी करु नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button