breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांना दिलासा! उत्पन्नाचे दाखल्यांसाठी मुदतवाढ!

शालेश शिक्षण व क्रीडा विभागाचे निर्देश

इयत्ता ११ वीच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा

पुणे । प्रतिनिधी

‘महाऑनलाईन’ पोर्टल वारंवार बंद आणि सर्व्हर डाऊनची समस्या असल्यामुळे हजारो अर्ज तहसीलदार कार्यालयाकडे पडून आहेत. त्यामुळे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला असून, नॉन क्रिमीलेअर व आर्थिकदृष्या दुर्बल घटक दाखल्यासाठी ३ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांनी दिली.

सन- २०२३-२४ च्या अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी नॉन क्रिमीलेअर (उन्नत गटात मोडत नसल्याचा) दाखला सादर करु न शकल्यास त्यांच्याकडून हमी पत्र किंवा पोहोच पावती घेऊन प्रवेश द्यावा, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत. तसेच, १२ वी नंतरच्या प्रवेशासाठीही हमीपत्र देऊन कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा – ‘‘प्रधानमंत्री आवास’’ लाभार्थींना सदनिकांचा ताबा देण्यासाठी ‘डेडलाईन’

सेवा हमी कायदा अंतर्गत निगर्मित होणाऱ्या दाखल्यांना उशीर होत असल्याने विभागांनी दाखले स्विकारण्यास १५ दिवसांची मुदतवाढ देण्याबाबतची सूचना प्रधान सचिव कार्यालयाने दि. ३० जून २०२३ रोजी दिली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयास कळवले होते.

नागरिकांच्या अडचणींवर तोडगा काढण्याचा प्रयत्न…

सन २०२३-२४ च्या इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी EWS प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. तसेच, शासकीय सेवांचा उपयोग करणाऱ्या लाभार्थींची संख्या पूर्वीपेक्षा चार ते पाच पटींनी वाढली असल्याने त्याचा महाआयटीच्या सर्व्हरवर अतिरिक्त भार पडत आहे. यामुळे दाखला ऑनलाईन पद्धतीने निर्गमित होण्यास १५ ते २० मिनिट वेळ लागत आहे. सर्वसाधारणपणे दिवसभरात ५० ते ६० हजार दाखले निर्गमित होतात. परंतु, सध्यस्थितीमध्ये विविध विभागांत नागरिकांना शैक्षणिक प्रवेश, नोकर भरती इत्यादींसाठी दाखल्यांची तातडीने आवश्यकता आहे. परंतु, दाखले ऑनलाईन पद्धतीने निर्गमित करण्यास उशीर होत असल्याने नागरिकांची अडचण होत आहे. आता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना दिलास मिळाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button