ताज्या घडामोडीपुणे

त्या’ खुनाचा उलगडा, अनैसर्गिक अत्याचार करून खून, तरुण अटकेत

पुणे | कोथरूड परिसरातील एकलव्य महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी रात्री एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाचा पोत्यात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. या गुन्ह्याचा छडा लागला असून पोलिसांनी या प्रकरणी 21 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. या तेरा वर्ष तरुणावर आधी अनैसर्गिक अत्याचार केला आणि त्यानंतर गळा दाबून त्याचा खून केल्याचे उघडकीस आले.

पिंटू सरजू गौतम (वय २१, उत्तरप्रदेश, बनारस) याला पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलगा आणि आरोपी कोथरूडच्या म्हातोबा नगर परिसरात राहतात. खून झालेला मुलगा मुळचा तेलंगणा येथील आहे. तो आई-वडिलांसोबत रहात होता. तर आरोपी पिंटू हा याच भागात पाठाची गिरणी चालवत असे. त्यामुळे पिंटू त्याला मुलाला ओळखत होता. दरम्यान, गुरूवारी सायंकाळी त्याने या मुलाला गोडबोलून नेले. त्यानंतर त्याच्यावर घरात अनैसर्गिक अत्याचार केले. अत्याचार केल्यानंतर पिंटूला तो कोणाला सांगेल याची भिती वाटली. त्यामुळे त्याने त्याचा गळा दाबून खून केला. तसेच मृतदेह पोत्यात भरून तो एका शाळेच्या मैदानात नेऊन टाकला.

दरम्यान, पोते टाकताना काही नागरिकांनी पिंटूला पाहिले. त्यांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ कोथरूड पोलीसांना याची माहिती दिली. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक महेंद्र जगताप व पथकाने येथे धाव घेतली. पाहणी केल्यानंतर अल्पवयीन मुलाचा मृतदेह असल्याचे समोर आले.

माहिती घेतली असता तो विशेष मुलगा असल्याचे समजले. लागलीच पोलीसांनी भागात असणाऱ्या सीसीटीव्ही पडताळणी केली. तर, दुसरीकडे तांत्रिक तपास केला गेला. त्यात पिंटूसोबत तो घटनेपुर्वी तीन तासांहून अधिक वेळ असल्याचे दिसून आले. पिंटूला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबूली दिली व घटना सांगितली. अनैसर्गिक अत्याचारातून हा प्रकार घडल्याचे तपासात समोर आले. अधिक तपास कोथरूड पोलीस करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button