ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

एक्सर्बिया अबोड सोसायटीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

चिमुकल्यांची भाषणे, नृत्याने भारावले उपस्थित

वडगांव मावळः जांभुळगाव येथील एक्झर्बिया अॅबोड सोसायटीमध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात पार पडली. या निमित्त लहानग्यांचे पारंपाारिक वेषभूषेतील नृत्य, तसेच भाषणे लक्षवेधक ठरली. संयोजक दीपक संभाजी पाटील यांनी अतिशय कमी वेळेत अत्यंत यशस्वी नियोजन केल्यामुळे कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला.

Exorbia, Abode, Society, Excitement, Celebration, of little ones, speeches, dances, overwhelmed, present,
Exorbia, Abode, Society, Excitement, Celebration,
of little ones, speeches, dances, overwhelmed, present,

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी एक्झर्बिया मित्र मंडळाचे, कृष्णा लोखंडे, दीपक, पाटील, संजय शिंदे, पंढरीनाथ हिंगे, सुनील पवार, बाबासाहेब लभडे, अजित गोलराखे, नीलेश परदेशी, अजय उदावंत, योगेश हुले, दिनेश सकट, शैलेश घाग, सुमित पुरी आदींनी परिश्रम घेतले.

यावेळी मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते कृष्णा लोखंडे म्हणाले की, या वर्षी शिवजयंती उत्सव कमी वेळात चांगल्या प्रकारे साजरा करू शकलो. छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम राज्यकर्ते होते. त्यांना मॅनेजमेंट गुरू असेही संबोधतात. ते त्यांच्या गुणांमुळेच. ज्या व्यक्तीमध्ये जे गुण आहेत ते हेरून त्याचा स्वराज्यासाठी त्यांनी उपयोग केला. त्याचप्रमाणे आपल्या मंडळातही ज्याची जी क्षमता आहे ते कार्य तो न सांगता करत असतो. अगदी शिवरायांचा मावळ्याप्रमाणे. कठीण परिस्थितीत ही आपण मंडळाचे कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करता. सर्व मंडळाचे व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक कौतुक व अभिनंदन.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button