breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

“१० दिवसांत सगळं झालं”, एकनाथ खडसेंनी सांगितला जळगाव पालिकेतील विजयाचा फॉर्म्युला!

जळगाव |

जळगाव महानगर पालिकेमध्ये सत्ताधारी भाजपाला पराभवाचा धक्का देत शिवसेनेनं भगवा फडकावला आहे. हा भाजपासोबतच जळगावमध्ये ज्यांचं प्रस्थ मानलं जातं, ते भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांचं मोठं अपयश म्हटलं जात आहे. त्याचवेळी काही महिन्यांपूर्वीच “बदल करून दाखवेन”, असा शब्द व्यासपीठावर जाहीरपणे देत भाजपाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांचा तो मोठा विजय मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेत हा विजय कसा जुळवून आणला? याचा फॉर्म्युलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितला आहे. गेल्या १० दिवसांत फासे फिरल्याचं त्यांनी म्हटलं आहे!

काय म्हणाले एकनाथ खडसे?

भाजपाची एकहाती सत्ता असून देखील जळगावात भाजपाला पराभवाची धूळ चारण्याचा सगळा प्लॅन गेल्या १० दिवसांत जुळून आल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. शिवाय, या प्लॅनबद्दल फारसं कुणाला काही माहिती नसल्याचं देखील ते म्हणाले आहेत. “जळगावात भाजपाची एकहाती सत्ता होती. पण कामं होत नसल्यामुळे आणि भ्रष्टाचार वाढल्यामुळे सगळे नगरसेवक आणि जनता देखील नाराज होती. त्यामुळे आमच्याकडे येण्यासाठी नगरसेवकांना फारसा आग्रह करावाच लागला नाही”, असं ते म्हणाले.

“१० दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि…”

दरम्यान, जळगाव महानगरपालिका निवडणुकीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेविषयी देखील एकनाथ खडसेंनी सांगितलं. “१० दिवसांपूर्वी याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की तुम्ही महापौरपदासाठी तुमचा उमेदवार दिला, तर मी मदत करू शकेन. नुसतं आवाहन केलं, तर नगरसेवक जमू शकतात. त्यानंतर एकनाथ शिंदे, विनायक राऊत यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर नाराज नगरसेवकांना फार आग्रह करण्याची गरजच पडली नाही. यातले बरेच नगरसेवक मला आधी भेटूनही गेले होते. त्यानंतर हा सगळा प्लॅन ठरला. आमच्याकडे आलेले २२ होते, शिवसेनेचे १५ होते आणि एमआयएमचे ३ आमच्याकडे आलेच होते”, असं खडसेंनी सांगितलं आहे.

वाचा- जळगावात भाजपाने सत्ता गमावली; गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा झेंडा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button