breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिव जन्मोत्सवाचे उत्साहात आयोजन

पिंपरी | प्रतिनिधी 
केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल आकुर्डी मध्ये   छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला.यावेळी शाळेची संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. श्री  धनंजय वरणेकर,  सचिव श्री ज्ञानेश्वर काळभोर, संचालक श्री राम  रैना,  उपप्राचार्या  सरबजीत कौर महल , यांच्या हस्ते शिवप्रभूंच्या मूर्तीचे पूजन करून, जन्मदिवसाच्या,नामकरणाचा  (बारशाचा) विधी अत्यानंदाने  करण्यात आला.   छत्रपती शिवरायांच्या  अखंड  ऊर्जेचे व प्रेरणेचे  प्रतीक   म्हणून  दिव्य ज्योत  प्रज्वलित करण्यात आली .

यावेळी शाळेत उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह अगणित होता.  छत्रपती शिवराय, जिजाऊ मासाहेब, संभाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू, व विविध मावळ्यांच्या वेशभूषा मध्ये विद्यार्थी उपस्थित होते.छत्रपती शिवरायांचे विचार जगात सर्वत्र पोहोचावेत म्हणून केंब्रिज स्कूलचे विद्यार्थी तेजस जाधव,, करण चौधरी, तेजल शिंदे, सारंग परभाणे, मुग्धा पुंडे,पार्थ विधाटे, यांनी मराठी हिंदी  भाषेबरोबरच इंग्रजी भाषेतही छत्रपतींचे विचार मांडून विश्वाला छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व समजवण्याचा प्रयत्न केला.

शिक्षिका सौ अपेक्षा कुलकर्णी व प्रियेश पोरे यांनी जिजाऊ माँसाहेबांचे बाल शिवबाला शिकवलेले विचार व संस्कार अभिनयाद्वारे प्रस्तुत केले.
पूर्वप्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी छत्रपतींच्या व मावळ्यांच्या भूमिकेतून आपले विचार यावेळी व्यक्त केले. प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्याची माहिती व्हिडिओ द्वारे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली .

शाळेच्या विद्यार्थ्यांचा हा जल्लोष व उत्साह पाहून ” केंब्रिज गुरुकुल स्कूल चे विद्यार्थी शिवरायांसारख्या महान युगपुरुष यांचे विचार जगापर्यंत पोहोचून आदर्श,सक्षम व बलशाली राष्ट्र निर्माण करण्यास सदैव पुढे राहतील,” असा विश्वास संचालक श्री राम  रैना यांनी व्यक्त केला.

शालेय शिक्षक श्री परिक्षित कुंभार यांनी भारदस्त व रोमांचकारी सूत्रसंचालन करत छत्रपतींच्या जीवनातील प्रेरक प्रसंग, समर्थांची वचने, व शिवरायांचे मौलिक विचार समोर सादर केले.
कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे छत्रपतींच्या नावाचा केलेला जयघोष शाळेच्या सर्व परिसरात निनादत होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button