breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

प्रत्येक चित्रपट शुक्रवारीच का प्रदर्शित केला जातो? वाचा यामागचं कारण..

Movie Releases On Fridays : शुक्रवार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पटकन येतो तो शब्द म्हणजे वीकेंड. शनिवार आणि रविवारी सुटी असल्यानं बरेच जण आपल्या सहकाऱ्यांसोबत तसेच कुटुंबियांसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करत असतात. तसेच बरेच जण आठवडाभराचा थकवा दूर करण्यासाठी चित्रपट पाहण्याचा देखील प्लॅन करत असतात. यातील काही चित्रपटप्रेमी असे आहे की जे शुक्रवारी चित्रपट रिलीज झाला की त्याच दिवशी तो पाहतात देखील. यापैकी जवळपास सर्वच चित्रपट हे शुक्रवारीच प्रदर्शित होतात हेही जवळपास सर्वच चित्रपटप्रेमींना माहीत असेल. याबाबत तुमच्या मनात कोणता प्रश्न आलाय का? तर पाहुयात जवळपास सर्वच चित्रपट हे शुक्रवारीच का प्रदर्शित होत असतात.

आपल्या देशातील तरुण पिढीसह बरेच जण पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत आहेत. त्याचप्रमाणे आपली चित्रपटसृष्टीही यापासून काही दूर नाहीये. आपल्या चित्रपटसृष्टीने बऱ्याच गोष्टी या हॉलिवूडकडून अंगिकारल्या आहेत. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्याच्या नादात चित्रपट प्रदर्शित करण्याचा दिवसाचे देखील आपण अनुकरण केले आहे. हॉलिवूडमध्ये ‘गॉन विथ द वाइंड’ हा चित्रपट पहिल्यांदाच 1939 साली शुक्रवारच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामुळे येथून पुढे शुक्रवारीच चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरूवात करण्यात आली. आणि हॉलिवूडचं बोलायचं झालं तर तेथे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस पहिले म्हणजेच गुरुवारी चित्रपटाचा प्रीमियर दाखवण्याची पद्धत होती. त्यामुळेच चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित करण्याचा पायंडा पडला. या गोष्टीने जगभरातील चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधले गेले.

त्यानंतर यात भारतीय तरी कसे मागे राहतील, त्यांनी देखील हॉलिवूडच्या या निर्णयाचे अनुकरण केले. त्यानंतरही लगेचच शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याला सुरूवात झाली असे ही म्हणता येणार नाही. कारण १९४७ साली भारतीय चित्रपटसृष्टीत प्रचंड असा गाजलेला ‘निल कमल’ हा चित्रपट सोमवारच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आला होता. त्या काळात देखील शुक्रवारची तारीख किंवा मुहुर्तावरून वाद पाहायला मिळाले नाहीत. १९४७ साली ‘निल कमल’ हा सदाबहार चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 3 वर्षांनी भारतीय चित्रपटसृष्टीला नवी झळाळी देणारा असा ‘मुगल-ए-आझम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर संपूर्ण देशभरात याच चित्रपटाची चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळालं. देशभरातील नागरिकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं. एक गोष्ट पाहायला गेलं तर, चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी शुक्रवारच्याच दिवसाची निवड करणे आणि आर्थिक फायदा यांचा थेट संबंध पाहायला मिळतो. हीच बाब या काळात चित्रपट निर्मात्याच्या डोक्यात आली. आणि तेथून पुढे प्रत्येक चित्रपट हा शुक्रवारीच प्रदर्शित केला जाऊ लागला.

हेही वाचा – कसबा मतदारसंघातील मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

चित्रपट करणाऱ्या निर्मात्यापासून ते त्यातील कलाकार आणि तो चित्रपट पाहणारे प्रेक्षक सर्वानाच त्या चित्रपटातून वेगवेगळ्या अपेक्षा असतात. चित्रपटात काम करण्याऱ्या कलाकारांना प्रसिद्धी हवी असते, निर्मात्यांना नफा आणि प्रेक्षकांना मनोरंजन. ही एक प्रकारची साखळी आहे. चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा हा चित्रपट प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन पाहतात. प्रेक्षकांना चित्रपट आवडला तर आपोआपच कलाकारांना प्रसिद्धी मिळते आणि निर्मात्यांना यातून भरघोस असा नफा मिळतो. त्यामुळेच कदाचित चित्रपटसृष्टीतील जवळपास सर्वच निर्माते आठवडाभरात इतर दिवसांपेक्षा शुक्रवारलाच पसंती देतात. याशिवाय हिंदू धर्मात देखील शुक्रवारचे महत्व आहे. हा दिवस देवी लक्ष्मीचा वार मानला जातो, त्यामुळेही चित्रपटाच्या प्रदर्शनाला शुक्रवारचीच निवड केली जाते. शेवटी प्रत्येक जण काम हे पैशासाठीच करत असतो, शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार असल्याने या वाराबाबत श्रद्धा निर्माण झाली. त्यामुळे कोणत्याही चित्रपटाची शूटिंग सुरू करताना पहिले तो कोणताही निर्माता असो वा कोणताही मोठा व्यावसायिक त्यांच्याकडून प्रथमतः लक्ष्मी देवीची आराधना नक्कीच केली जाते. कारण देवी लक्ष्मीच्याच कृपेने व्यवसायात भरभराट येते, याबाबतचा विश्वास त्यांच्या मनात असतो. कदाचित हीच बाब डोळ्यासमोर ठेऊन कित्येक निर्माते शुक्रवारच्याच दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्याला पसंती देतात. जेणेकरून त्यांचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करू शकेल. केवळ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठीच नाही तर चित्रपटाचं शूटिंग सुरू करताना देखील बरेच निर्माते हे शुक्रवारचीच निवड करत असतात.

जेणेकरून चित्रपटाच्या शूटिंगमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करावी. याशिवाय चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित करण्यामागे एक व्यावसायिक कारण असल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं. सध्याच्या तरुणांमध्ये मल्टिफेक्समध्ये चित्रपट पाहण्याची क्रेझ आहे, हे आपण सर्वांनाच माहीत आहे. मल्टिफेक्सचं बोलायचं झालं तर मल्टिफ्लेक्समध्ये चित्रपट स्क्रीनिंग करण्यासाठी इतर दिवशी चार्ज जास्त लागतो तर शुक्रवारी हा चार्ज कमी लागतो. त्यामुळेच व्यावसायिकांचे बरेच पैसे वाचतात, कदाचित यामुळेही चित्रपट निर्माते कोणताही चित्रपट शुक्रवारीच प्रदर्शित करतात. तसा विचार केला तर सगळेच चित्रपट हे शुक्रवारीच प्रदर्शित व्हायला हवेत असा काही नियम नाहीये. याचचं उदाहरण द्यायचं झालं तर सलमान खान त्याचा चित्रपट हा ईदच्या दिवशीच प्रदर्शित करतो. भले मग ती ईद कोणत्याही वारी किंवा दिवशी येऊ. याला अजून एक अपवाद आहे. तो म्हणजे २०१६ साली इरु मगन या चित्रपटाचे प्रदर्शन शुक्रवार सोडून गुरुवारीच करण्यात आले होते. आणि देशभक्तीच्या विषयावर तयार करण्यात आलेला तसेच आमिर खान याची मुख्य भूमिका असलेला ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट देखील २६ जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित करण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button