बॉलिवुडसाठी 2022 हे वर्ष फ्लॉप का ठरलं?
![Why did 2022 become a flop for Bollywood?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/bollywod-780x470.jpg)
सम्राट पृथ्वीराज, लाल सिंग चढ्ढा आणि विक्रम वेदा ठरले या वर्षातील सुपर फ्लॉप सिनेमे
वैष्णव जाधव/ प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवुडसाठी 2022 हे वर्ष फ्लॉप ठरलं. या वर्षात बॉलिवुडचे 850 हिंदी सिनेमे प्रदर्शित झाले. यातील 200 सिनेमे ओटीटी प्लॉटफॉर्म वरती प्रदर्शित झाले. मात्र अनेक असे सिनेमे बिग बजेट असुन सुद्धा काही फारशी कमाई करू शकले नाहीत. 2022 या वर्षात 23 असे सिनेमे होते ज्यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. पण यातील फक्त 5 सिनेमे हिट झाले.
2022 या वर्षात हिट ठरलेले पाच सिनेमे म्हणजे द काश्मिर फाईल्स, भूल भूलैया 2, दृश्यम 2, ब्रह्मास्त्र आणि गंगूबाई काठियावाडी. या सिनेमानी बॉलिवुडचा दबदबा कायम राखला. यासोबतच पुष्पा, आरआरआर, केजीएफ, कांतारा या प्रादेशिक सिनेमांनीही चांगलिच कमाई केली. मग कोणते सिनेमे सुपरफ्लॉप ठरले ? तर अक्षय कुमारचे 220 कोटींचं बजेट असणारा सम्राट पृथ्वीराज, 160 कोटीचं बजेट असणारा बच्चन पांडे, 70 कोटी बजेट असणारा रक्षाबंधन, राम सेतू आणि कटपुतली.
यासोबतच, आमिर खानचा 180 कोटीचं बजेट असणारा लालसिंग चढ्ढा, श्रतिक आणि सैफ अली खानचा 150 कोटींचं बजेट असणारा विक्रम वेदा, रणविर कपुरचा 150 कोटींचं बजेट असणारा समशेरा, विजय देवरकोंडाचा लाइगर, एक विलन रिटर्न्स, जुग जुग जियो, हिरोपंती 2, रनवे 2, भेडीया, झुंड हे सिनेमे देखील या वर्षात काही खास कमाई करू शकले नाहीत.
बॉलिवुड सिनेमे फ्लॉप का ठरले?
बॉलिवुड सिनेमांच्या कमाईवर कोव्हिडचा मोठा परिणाम झाला. पण काही सिनेमे वाईटच होते. सिनेमाची तीच ती कहाणी. तेच हिरो. काही सिनेमांची कहाणी चांगली होती मात्र कमी पडलं ते प्रमोशन, मार्केटिंग. मात्र आता येणाऱ्या वर्षात कोणते सिनेमे हिट ठरणार हे पाहणं देखील महत्वाचं आहे.