ताज्या घडामोडीपुणेमनोरंजन

अभिनेता विवेक ओबेरॉय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पुण्यात

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला १ कोटी किंमतीचे ६६ कॅरेट डायमंड टिळक अर्पण

पुणे : महाराष्ट्रभरात गणपती उत्सवाचा मोठा उत्साह आहे. मुंबईचा लालबागचा राजा किंवा पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटींनी गर्दी केली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी अभिनेता विवेक ओबेरॉय पुण्यात पोहोचला होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला १ कोटी किंमतीचे ६६ कॅरेट डायमंड टिळक अर्पण केले.

अभिनेत्याकडून दगडूशेठ गणपतीला हिरे अर्पण
अभिनेता विवेक ओबेरॉय सॉलिटेरियो कंपनीचा संस्थापक आहे. त्याने त्याच्या कंपनीचे हिरे अर्पण केले आहेत. विवेक ओबेरॉयच्या पुण्यातील एकाच लॅब ग्रोन डायमंड ज्वेलरी स्टोअरमधून सुरू झालेला सॉलिटेरियो कंपनीचा प्रवास आता ७ देशांतील २१ शहरांमध्ये विस्तार झाला आहे. सॉलिटेरियोचा संस्थापक आणि अभिनेता विवेक ओबेरॉय याने दगडूशेठ गणपतीची महाआरती केली आणि बाप्पाचे आशीर्वाद घेतले.

व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत
दगडूशेठ गणपती पुणे या सोशल मीडिया अकाऊंटवरुन विवेक ओबेरॉयचा गणपतीची आरती करताना, तसंच ६६ कॅरेटचे १ कोटी रुपयांचे हिरे अर्पण करतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी अभिनेत्याचं कौतुक केलं आहे. व्हिडिओमध्ये हिऱ्यांचं काम होताना त्याचीही झलक दाखवण्यात आली आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे.

अभिनेता कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक
दरम्यान, ४८ वर्षीय अभिनेत्याने राम गोपाल वर्मा यांच्या कंपनी या सिनेमातून सिनेसृष्टीत करिअरची सुरुवात केली होती. या सिनेमासाठी त्याला फिल्मफेअरचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट पुरस्कारही मिळाला होता. त्याने जवळपास १५ वर्ष सिने इंडस्ट्रीत काम केलं. २०१९ मध्ये तो शेवटचा सिनेमात दिसला. होता. विवेक ऑबेरॉय मागील अनेक काळापासून सिने इंडस्ट्रीत फारसा सक्रिय नाही. मात्र तरीही त्याची कमाई कोट्यवधींच्या घरात आहे.

चित्रपटांमध्ये अभिनेता सक्रिय नसला तरी तो अनेक प्रोडक्शन हाऊस, डायमंड व्यवसायातून मोठी कमाई करतो. अभिनेत्याची स्वत:ची कन्स्ट्रक्शन कंपनीही आहे. अनेक स्टार्टअप्समध्येही त्याने गुंतवणूक केली आहे. यातूनही त्याची कमाई होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता १०० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button