‘तो डुकराप्रमाणे खातो आणि श्वानासारखा व्यायाम करतो’; प्रसिद्ध अभिनेत्याचे सलमान खानबद्दल विधान
![Vindu Dara Singh said that Salman Khan eats like a pig and exercises like a dog](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Salman-Khan-780x470.jpg)
Salman Khan | अभिनेता सलमान खान याला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. सलमान खान फक्त त्याच्या सिनेमांमुळेच नाहीतर, इतर अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. आता सलमानचा कॉलेजच्या दिवसांपासून जवळचा मित्र असलेल्या विंदू दारा सिंगने त्याच्या आहाराबद्दल व व्यायामाबद्दल विधान केलं आहे.
सलमान सांगायचा की माझी शरीरयष्टी पाहून त्याने जास्त व्यायाम करायला सुरुवात केली आणि मी त्याला नेहमी म्हणायचो की तो खूपच जास्त व्यायाम करतोय. इतकंच नाही तर तो जेवतोही जास्तच. तो डुकराप्रमाणे खातो आणि श्वानासारखा व्यायाम करतो, असं विंदू सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
हेही वाचा – ‘महाराष्ट्रात दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन खेळवली जातायत’; राज ठाकरेंचा खोचक टोला
तो जेवढं खातो, ते पाहून जर आपण विचारलं, ‘भाई, हे सगळं जेवण कुठे जातं?’ तो नेहमी उत्तर देतो की तो जाळून टाकतो आणि खरंच संध्याकाळच्या व्यायामादरम्यान तो तेच करतो. सलमान एक अद्भुत आत्मा असलेली व्यक्ती आहे. मी त्याच्यावर प्रेम करतो, तो खूप मदत करणारा माणूस आहे, असं विंदू म्हणाला.
सलमानचे वडील सलीम खान त्याला रोज पैसे द्यायचे. हे पैसे ते सलमानचा मदतनीस नदीमला द्यायचे. पण शेवटी सलमानचा काय खर्च आहे? त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला जे काही दिलं मग ते ५० हजार असो, एक लाख असो ते सर्व पैसे तो गरिबांना दान करायचा. आणि त्याने केलेल्या या मदतीचे आशीर्वाद आजही त्याच्याबरोबर आहेत. तो आताही दर महिन्याला किमान २५-३० लाख रुपयांची देणगी देतो, असा खुलासाही विंदूने केला.