![The theater lovers of Mumbai can enjoy the drama songs of Nathreshshtha Gopinath Savkar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Natsamtrat-780x470.jpg)
मुंबई : श्री गोपीनाथ सावकार स्मृति विश्वस्तनिधी आयोजित गोपीनाथ सावकार स्मृतिसुगंध नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या गाजलेल्या मराठी संगीत नाटकातील नाट्य गीतांचा नजराणा असणारा ‘स्मृती सुगंध’ हा कार्यक्रम शनिवार,दिनांक १४ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी *४.०० वाजता रविंद्र नाट्य मंदिर,पु. ल. देशपांडे अकादमी, मिनी थिएटर, ३रा मजला, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना सुभाष सराफ यांची असून या कार्यक्रमास मा. रमाकांत खलप ( माजी कायदामंत्री, केंद्र सरकार),मा.अनिल खवंटे ( प्रसिद्ध उद्योगपती, गोवा )आणि नटश्रेष्ठ मा.अशोक सराफ यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
गायक कलाकार श्रीरंग भावे, नूपुर गाडगीळ, श्रीया सोंडूर बुवा असून साथीला साई बँकर(तबला),निरंजन लेले (ऑर्गन), तर मुकुंद सराफ, प्रतिभा सराफ यांचे निवेदन असणार आहे.
कार्यक्रमास तांत्रिक सहाय्य विश्वास महाशब्दे ,प्रसिद्धी समन्वयक शीतल करदेकर, आणि सुत्रधार रविंद्र ढवळे आहेत.हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असणार आहेत.
अशी माहिती श्री गोपीनाथ सावकार स्मृति विश्वस्तनिधीचे कार्यवाह शीतल करदेकर,रविंद्र ढवळे यांनी दिली आहे.