Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
Sushant Sing Suicide Case! रियाकडे कोट्यावधींचे दोन फ्लॅट, सुशांतच्या खात्यातून 15 कोटीच्या व्यवहाराचा आरोप, ईडी अॅक्शन मोडमध्ये
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Rhea-Chakraborty-Sushant-singh-Rajput.jpg)
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात आता ईडीने वेगवान तपास सुरु केलेला आहे. ईडीच्या तपासात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीकडे कोट्यावधी रुपये किमतीचे दोन फ्लॅट असल्याचं उघड झालेलं आहे. या फ्लॅटमधील गुंतवणुकीची कसून चौकशी होत आहे. फ्लॅटचा व्यवहार आता ईडीच्या रडारवर आहे. रियाला शुक्रवारी (7 जुलै) चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलेलं आहे.
दुसरीकडे बिहार सरकारच्या सीबीआय चौकसीच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकारने सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. केंद्र सरकारने याबाबत आज आदेश दिले आहेत. यानंतर सीबीआयने तातडीने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअर मिरिंडा, श्रृती मोदी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.