breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

Sushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीकडून कसून चौकशी सुरु आहे. ईडीच्या चार अधिकाऱ्यांकडून गेल्या काही तासांपासून रियाची चौकशी सुरु आहे. ईडी कार्यालयात रियासोबत तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी उपस्थित आहेत. ईडीकडून रियाची आज (7 ऑगस्ट) जवळपास पाच ते सहा तास चौकशी होऊ शक्तीये. सुशांतच्या बँक खात्यातून रियाने 15 कोटी रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलेला आहे. या आरोपांबाबत ईडी रियाची चौकशी करु शकते.

रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविकसोबत ईडी कार्यालयात जाताना दिसली होती. मात्र, काही तासांच्या चौकशीनंतर शौविक ईडी कार्यालयातून बाहेर पडला होता. यावेळी त्याने प्रसारमाध्यांना कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. थोड्या वेळाने तो पुन्हा ईडी कार्यालयात आला होता. तो रियाच्या घरी गेला होता. तिथून काही महत्त्वाचे कागदपत्रे घेऊन तो पुन्हा ईडी कार्यालयात दाखल झाला आहे.

रिया आणि शौविक यांनी काही कंपन्या स्थापन केल्या आहेत. मात्र, या कंपन्यांचा कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाहीय. या कंपन्या मनी लॉन्ड्रिंगसाठी स्थापन करण्यात आल्या होत्या का? या कंपन्यांचं रजिस्ट्रेशन होतं का? असे सवाल ईडीकडून उपस्थित करण्यात आलेले आहेत. त्याच कंपन्यांसंबंधित कागदपत्रे घेण्यासाठी शौविक तिच्या घरी गेला होता, अशी माहिती समोर आलेली आहे.

याआधी ईडीकडून रिया चक्रवर्तीचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा याची जवळपास 9 तास कसून चौकशी झाली होती. मिरांडा काल (गुरुवार) दुपारी दीड वाजता ईडी कार्यालयात हजर झाला होता. मिरांडा रियाचे आर्थिक व्यवहार पहायचा. बँक खाती, पैसे काढणे, पैसे भरणे, आर्थिक व्यवहार अशी कामे तो करायचा.

रिया चक्रवर्तीकडे कोट्यवधी रुपये किमतीचे दोन फ्लॅट असल्याचं ईडीच्या तपासात उघड झालं आहे. या फ्लॅटमधील गुंतवणुकीची कसून चौकशी होत आहे. फ्लॅटचा व्यवहार आता ईडीच्या रडार आहे. रियाला आज (शुक्रवार 7 ऑगस्ट) चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलेलं आहे. रियाने सुशांतच्या बँक खात्यातून सुमारे 15 कोटी रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी केलेला आहे. हा सर्व व्यवहार संशयास्पद असल्याने त्याचा तपास आता ईडीचे अधिकारी करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button