‘३ इडियट्स’ सिनेमाचा सीक्वेल लवकरच येणार; सिनेमातील अभिनेत्याची माहिती
![Sharman Joshi said that the sequel of 3 Idiots movie will come soon](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/3-Idiots-780x470.jpg)
3 Idiots : राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘३ इडियट्स’ सिनेमाचा सीक्वेल लवकरच येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. २००९ मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये अमिर खान, शरमन जोशी आणि आर माधवन या स्टार अभिनेत्यांनी काम केलं आहे. दरम्यान, या सिनेमाचा सिक्वेल बाबत अभिनेता शरमन जोशी यांनी भाष्य केलं आहे.
अभिनेता शरमन जोशी म्हणाला की, ‘३ इडियट्स’ चा दुसरा भाग आला तर खरंच खूप मज्जा येईल. या सिनेमाच्या सीक्वेलची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात याचा राजू सरांना अंदाज आहे. चाहत्यांना निराश करण्याची त्यांची इच्छा नाही. दुसऱ्या भागाच्या कथानकावर सध्या राजू सरांचं काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच ‘३ इडियट्स’ चा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.
हेही वाचा – आई तुळजाभवानीच्या अभिषेक पूजेच्या शुल्कात मोठी वाढ!
‘३ इडियट्स’ च्या सीक्वेलवर काम करण्यासाठी राजू सर खूप उत्सुक आहेत. सध्या कथानकावर काम सुरू असल्याने प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल. कथानकाचं काम पूर्ण झाल्यावर लगेचच आम्ही शूटिंगला सुरूवात करू, असंही शरमन जोशी म्हणाला.
दरम्यान, ‘३ इडियट्स’ हा सिनेमा २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये अमिर खान, आर माधवन, शरमन जोशी आणि करीना कपूर खान या स्टार अभिनेत्यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. ५५ कोटी बजेट असणाऱ्या या सिनेमाने जगभरात तब्बल ४६० कोटींची कमाई केली होती. आता या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.