‘OMG २’ चित्रपटावरून शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत; म्हणाले..
OMG २ : बॉलिवूड अभिनेते अक्षय कुमार याचा ‘ओह माय गॉड’ या सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अक्षय कुमारने भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील काही सीन मुळे वाद सुरू आहे. दरम्यान, यावरून अभिनेते शरद पोंक्षेंनी एक पोस्ट शेअर केली आहे.
शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर आपली भुमिका मांडत असताता. नुकतेच त्यांनी अक्षय कुमारच्या ‘OMG २’ चित्रपटाबाबत पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, प्रत्येकानं अवश्य पहावा असा सिनेमा. यावरून नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरही त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – राष्ट्रप्रेमाचा नारा देत तिरंगा बाईक रॅलीला उस्त्फूर्त प्रतिसाद
प्रत्येकानं अवश्य पहावा असा सिनेमा. pic.twitter.com/BuDTvM71pq
— SHARAD PONKSHE (@ponkshes) August 13, 2023
सनातनी असल्याचा अभिमान आहे…ह्या चित्रपटातून जो विषय मांडला आहे तो खरच खूप गंभीर आणि महत्त्वाचा आहे.. आणि असा विषय मांण्यासाठी फक्त आणि फक्त हिंदू धर्माचा, ग्रंथाचा असारा घेतला कारण सनातन धर्म प्राचीन तर आहेच पण प्रत्येक बाबतीत परिपूर्ण आहे.. हा गंभीर विषय मांडताना इतर धर्माचा कुठेच आधार नाही घेतला जस omg घेतला होता, असं नेटकऱ्याने म्हटलं आहे. यावर शरद पोंक्षे यांनी ‘अगदी बरोबर’ असं म्हटलं आहे.