ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान बॉलिवूडचे सर्वांत श्रीमंत कपल

कपलकडे आज 7 हजार कोटींपेक्षा अधिक संप्तती,आज बॉलिवूडवर राज्य करत आहे

\मुंबई : इंडस्ट्रीमधून कायम सेलिब्रिटींच्या ब्रेकअप, वाद, घटस्फोट इत्यादी नकारात्मक गोष्टींच्या चर्चा रंगलेल्या असतात. पण नकारात्मकतेच्या इंडस्ट्रीमध्ये एक कपल असं आहे, जे कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतं. सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये स्थान भक्कम केलं आहे. अशा सेलिब्रिटींना आज कोणत्या ओळखीची गरज नाही. सध्या ज्या सेलिब्रिटी कपलची चर्चा रंगली आहे, त्यांनी शून्यापासून संसाराला सुरुवात केली आणि आज बॉलिवूडवर राज्य करत आहे. हे कपल दुसरं तिसरं कोणी नाही तर, अभिनेता शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान आहे.

जेव्हा शाहरुख खान बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत होता. तेव्हा पासून गौरी त्याच्या सोबत आहे. शाहरुखच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या, पण गौरी खान हिने किंग खानची साथ सोडली नाही. गौरी कायम चांगल्या वाईट काळात शाहरुख याच्यासोबत उभी राहिली. आज दोघांकडे गडगंज संपत्ती असून दोघे त्यांच्या तीन मुलांसोबत आनंदी आणि रॉयल आयुष्य जगत आहेत.

शाहरुख खान याला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, साता समुद्रापार देखील फार मोठी आहे. तर अभिनेत्याची पत्नी गौरी खान देखील प्रसिद्ध इंटेरियर डिझायनर आहे. अनेक सेलिब्रिटींच्या घराचं इंटेरियर गौरी हिने केलं आहे.

गौरी खान आणि शाहरुख खान दोघांची नेटवर्थ प्रचंड तगडी आहे. जवळपास 983 मिलियन यूएस डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार दोघांची मिळून संपत्ती 7304 कोटी रुपये आहे. जगातील श्रीमंत अभिनेत्याच्या यादीत देखील किंग खान अव्वल स्थानी आहे. गौरी खान हिच्या एकटीच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, किंग खान याच्या पत्नीची नेटवर्थ 220 मिलियन डॉलर आहे.

शाहरुख खान कोणत्या कोणत्या मार्गांनी करतो कोट्यवधींची कमाई?
अभिनय आणि सिनेमाच्या पडद्यावर सक्रिय असण्याव्यतिरिक्त, शाहरुख खान ब्रँड एंडोर्समेंट्समधून देखील मोठी कमाई करतो. एका जाहिरातीसाठी अभिनेता कोट्यवधी मानधन घेतो. किंग खान आयपीएल स्पोर्ट्स फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्सच्या मालकांपैकी एक आहे.

रेड चिलीज एंटरटेनमेंट नावाची कंपनी गौरी खान आणि शाहरुख खान एकत्रपणे चालवतात. शाहरुख खाननेही किड जेनिया ब्रँडमध्ये गुंतवणूक केल्याचं सांगितलं जातं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अभिनेता मोठी कमाई करतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button