‘हा माझा पहिला अन् शेवटचा चित्रपट असेल’; नेमकं काय म्हणाला शाहरूख खान?

मुंबई : शाहरूख खानच्या आगामी ‘जवान’ सिनेमाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. काल दुबईतील बुर्ज खलिफावर ‘जवान’चा ट्रेलर दाखवत जोरदार प्रमोशन केलं गेलं. या खास कार्यक्रमाला शाहरूख खान, दिग्दर्शक अटली आणि संगीत दिग्दर्शक अनिरूद्ध उपस्थित होते. यानंतर शाहरूखने चित्रपटाविषयी मोकळेपणा व्यक्त केला. यावेळी त्याने चाहत्यांना चकीत करणारं असं एक विधान केलं आहे.
शाहरूख खान नेमकं काय म्हणाला?
मी या चित्रपटासाठी टक्कलसुद्धा केलं आहे. असं मी माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच करणार नाही. हा माझा पहिला आणि शेवटचा चित्रपट असेल, ज्यामध्ये मी टक्कल असलेल्या लूकमध्ये दिसत असेन. आता मी तुमच्यासाठी हेसुद्धा केलं आहे. त्यामुळे किमान त्यासाठी तरी तुम्ही हा चित्रपट पाहायला थिएटरमध्ये जा. मला पुन्हा त्या लूकमध्ये पाहायची संधी मिळेल की नाही हे सांगता येत नाही, असं शाहरूख खान म्हणाला.
हेही वाचा – मुंबई हादरली! ठाकरे गटातील माजी नगरसेवकाची लोकलखाली आत्महत्या
The Man of the Event #ShahRukhKhan🔥🔥#JawanCelebrationAtBurjKhalifa pic.twitter.com/DwNGgkvCBQ
— JUST A FAN. (@iamsrk_brk) August 31, 2023
दरम्यान, जवान सिनेमाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला आहे. यामध्ये शाहरुखसोबत साऊथ स्टार विजय सेतुपती आणि नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अभिनेत्री दीपिका पदुकोणसुद्धा ‘जवान’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या ट्रेलरमध्ये ती काही ॲक्शन सीन्ससुद्धा करताना दिसतेय. या सिनेमातील ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’ हा डायलॉग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.





