Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

‘मी जेवणाशिवाय राहू शकते पण सेक्सशिवाय नाही’; प्रसिद्ध अभिनेत्रीचे वक्तव्य

Samantha Prabhu | बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींच्या लाइफस्टाइल आणि वक्तव्यांची नेहमीच चर्चा होत असते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते त्यांच्या चित्रपटांमधील बोल्ड सीनपर्यंत आणि कधी कधी त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळेही ते चर्चेत येतात. असाच काहीसा प्रकार साऊथची लोकप्रिय अभिनेत्री समांथा प्रभूसोबत घडला आहे. तिच्या एका बोल्ड वक्तव्याने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

समांथा प्रभू नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. तिचं अभिनेता नागा चैतन्यसोबतचं लग्न आणि त्यानंतर २०२१ मध्ये झालेला घटस्फोट यामुळे ती सतत बातम्यांमध्ये राहिली. पण आता तिचं एक नवं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

हेही वाचा  :  ‘अमित शाह यांनी शिंदे गटाला तंबी दिली’; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा 

एका फोटोशूट दरम्यान मुलाखत घेत असताना समांथाला एका पत्रकाराने एक अनपेक्षित प्रश्न विचारला, “तुला जर सेक्स आणि जेवण यापैकी एकच गोष्ट निवडायची असेल, तर तू काय निवडशील?” या प्रश्नावर समांथाने बिनधास्त आणि स्पष्टपणे उत्तर दिलं, “मी एक दिवस उपाशी राहायला तयार आहे. पण सेक्सशिवाय…त्यामुळे अशा परिस्थितीत मी जेवणाऐवजी सेक्स निवडेन.” समांथाचं हे उत्तर अनेकांसाठी धक्कादायक ठरलं. तिचं हे वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आणि त्यावरून तिला खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

समांथाचं हे वक्तव्य तिच्या स्पष्टवक्तेपणाचं उदाहरण आहे, ज्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. मात्र, काही लोकांना तिचं हे उत्तर आक्षेपार्ह वाटलं, आणि त्यांनी सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं. काहींनी तिच्या वक्तव्याला ‘अश्लील’ आणि ‘असंस्कारी’ असं संबोधलं, तर काहींनी तिच्या बोल्ड आणि प्रामाणिक उत्तराचं कौतुकही केलं.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button