‘हॉलो, लॉरेन्स भाई..’; सलमान खानच्या Ex गर्लफ्रेंडचा लॉरेन्स बिश्नोईला खास मेसेज
Somy Ali | राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळी झाडून हत्या केल्यानंतर गँगस्टार लॉरेन्स बिश्नोई पुन्हा चर्चेत आला आहे. बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेत सलमान खानला पुन्हा जीवेमारण्याची धमकी दिली आहे. बिश्नोई गँगकडून सलमान खानला धमकी मिळाल्यानंतर सलमानची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री सोमी अलीने बिश्नोईला खास मेसेज दिला आहे.
अभिनेत्री सोमी अलीने तिच्या इन्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लॉरेन्स बिश्नोई सोबत व्हिडीओ कॉलवर बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लॉरेन्स बिश्नोई हा खास तुझ्यासाठी मेसेज आहे. लॉरेन्स भाई नमस्ते, मी असं ऐकलं आहे आणि बघितलंदेखील आहे की तू जेलमधून झूम कॉल करतोस…मलादेखील तुझ्याशी बोलायचं आहे. कृपया करून मला सांगा की हे कसं शक्य होईल? या संपूर्ण जगात राजस्थान हे माझं सगळ्यात आवडतं ठिकाण आहे. मला तुझ्या मंदिरात पूजा करण्यासाठी यायचं आहे. पण, त्याआधी मला तुझ्याबरोबर झूम कॉलवर बोलायचं आहे. माझ्यावर विश्वास ठेव या तुझ्या फायद्याच्या गोष्टी आहेत. तुझा मोबाईल नंबर दे…खूप उपकार होतील, धन्यवाद.., असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा – CAA बाबत सुप्रीम कोर्टात निकाल, कलम 6A वैध असल्याचा कोर्टाचा निर्णय
सोमी अली आणि सलमान काही वेळ रिलेशनशिपमध्ये होते. अभिनेत्रीने सलमानवर गंभीर आरोपही केले होते. सलमान आणि संगीता बिजलानीचं लग्न मोडण्यास सोमी अली कारणीभूत होती. संगीताने सलमान आणि सोमी अलीला रंगेहाथ पकडलं होतं. खुद्द सोमी अलीनेच याचा खुलासा मुलाखतीत केला होता. आता लॉरेन्स बिश्नोईला थेट मेसेज दिल्याने सोमी अली पुन्हा चर्चेत आली आहे.