ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुन्हा धमकी

सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकींपेक्षा खूप वाईट होईल, असा इशारा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून ही धमकी देण्यात आल्याची माहिती मिळतेय. बिश्नोई गँगसोबतचा वाद मिटवण्यासाठी तब्बल ५ कोटी रूपयांची मागणी करण्यात आली आहे. सलमान खानने ५ कोटी रूपये इतके पैसे दिले नाही तर बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल, अशी थेट धमकीच बिश्नोई गँगकडून सलमान खानला देण्यात आली आहे. याप्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सअपद्वारे सलमान खानच्या धमकीचा मेसेज मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोईसोबतचे दीर्घकाळापासून सुरू असलेले वैर संपवण्यासाठी सलमान खानकडे ५ कोटींची मागणी करणारा धमकीचा हा मेसेज मुंबई ट्राफिक पोलिसांना मिळालाय. हा मेसेज लॉरेन्स गँगचा सदस्याकडून पाठवल्याचा दावा करण्यात आला आहे. मुंबई ट्राफिक पोलिसांना व्हॉट्सॲपद्वारे पाठवलेल्या या मेसेजमध्ये सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोईसोबतचं वैर संपवण्यासाठी समलान खानने ५ कोटी रूपये द्यावे. हा मेसेज हलक्यात घेऊ नका, अन्यथा सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकींपेक्षा खूप वाईट होईल, असा इशाराही या धमकीच्या मेसेजमध्ये देण्यात आला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button